Shivsena: निष्ठेचं फळ! अंबादास दानवे यांची विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता म्हणून वर्णी
shiv sena : शिवसेनेला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता म्हणून अधिकृच मान्यता देण्यात आली आहे. शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती केली आहे.
Maharashtra Legislative Council News : शिवसेनेला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता म्हणून अधिकृच मान्यता देण्यात आली आहे. शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून त्याबाबात अधिसूचना काढण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी विचारविनिमय करूनच अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती माहिती अरविंद सावंत यांनी सोमवारी दिली होती.
दरम्यान, शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सोमवारी अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्ष पदासाठी निवड करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे. अरविंद सावंत म्हणाले होते की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विधान परिषदेच्या विरोधी पक्ष पदावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी अशा प्रकारची शिफारस उपसभापती यांच्याकडे केली आहे. विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती होईल. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांशी विचारविनिमय करूनच निर्णय घेत आहोत. संख्येचा विचार केला तर संख्याबळ पण आमच्याकडे आहेत आपसातील कोऑर्डिनेशन सुद्धा आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेतील पक्षीय बलाबल काय?
78 सदस्यीय महाराष्ट्र विधानपरिषदेत भाजपचे 24 सदस्य आहेत. शिवसेनेचे 12 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी 10 - 10 सदस्य आहेत. लोक भारती, पीजेंट्स एंड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांचा प्रत्येकी एक एक सदस्य आहे. तर चार अपक्ष सदस्य आहेत. 15 जागा खाली आहेत.
बंडखोरीनंतर ठाकरे सरकार कोसळलं -
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसोबत बंडखोरी केल्यामुळे उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं होतं. एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेच्या 40 आमदारांचा पाठिंबा आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 15 आमदारांचा पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना दोन गटामध्ये विभागली आहे. एकनाथ शिंदे यांनी 40 शिवसेना आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.