आमचं फायनल! कोल्हापूर काँग्रेसकडे, बदल्यात सांगलीची जागा शिवसेनेला; संजय राऊतांनी जागावाटपाचं गणित सांगितलं
Maha Vikas Aghadi : सांगलीची जागा ही शिवसेनेला मिळाली असून त्या ठिकाणी डबल केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी उद्धव ठाकरेंनी या आधीच जाहीर केल्याचं संजय राऊत म्हणाले.
मुंबई: महाविकास आघाडीचे जागावापट (Maha Vikas Aghadi Seat Sharing) पूर्ण झालं असून कोल्हापूरची (Kolhapur) जागा ही काँग्रेसला देण्यात येणार आहे, त्याबदल्यात सांगलीची (Sangli) जागा ही शिवसेनेला देण्यात येणार असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलं. तसेच सध्या शिवसेनेकडे असलेली रामटेकची जागा ही काँग्रेसला देण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. सांगलीमधून डबल केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निवडणूक लढवतील असं या आधीच उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे आता सांगलीसाठी आग्रही असलेल्या काँग्रेसची भूमिका काय असेल हे पाहावं लागेल.
काय म्हणाले संजय राऊत?
जागावाटपाची चर्चा पूर्ण झाली आहे. त्यामध्ये सांगलीची जागा ही शिवसेना लढवणार असून त्या बदल्यात रामटेकची जागा काँग्रेसला दिली जाणार आहे. कोल्हापूर ही आमची सीटिंग जागा आहे. ती जागा काँग्रेसला देण्यात येणार आहे. कोल्हापुरातून शाहू महाराज हे आमचे उमेदवार असतील. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा ही शिवसेनेला देण्यात येईल. त्या ठिकाणी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे हे सांगलीमध्ये जाणार आहेत. त्या ठिकाणी चंद्रहार पाटलांसाठी ते सभा घेणार असून पदाधिकाऱ्यांची बैठकही घेण्यात येईल.
हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरू आहे. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काँग्रेसची चर्चा सुरू आहे अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली.
सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसचा आग्रह
सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसचा आग्रह असून त्या ठिकाणी वसंतदादा पाटील याचे नातू विशाल पाटलांनी तयारी सुरू केली आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीतही ही जागा काँग्रेसने स्वाभिमानीसाठी सोडली होती. त्यामुळे विशाल पाटील हे स्वाभिमीनीच्या तिकिटावर उभे होते. आता भाजपने या ठिकाणी संजयकाका पाटील यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
राहुल गांधी न झुकणारे नेते
शिवतीर्थ मोठी जनसभा झाली.मोठ्या शक्ती बरोबर लढत आहे. काल इंडियाआघाडी महाप्रचार सभा झाली . त्या ठिकाणी इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिले. राहुल गांधी देशातील लोकप्रिय नेते आहे. राहुल गांधी परखडपणे भूमिका मांडत आहे , ते झुकत नाहीत. हा त्यांचा बाणा या देशातील लोकांना आवडत आहे. जे लोक शरण गेले त्यांना इतिहास माफ करणार नाही आम्ही लढणारे लोक आहोत.
दुसऱ्यांची पोरं पळवणारा पक्ष म्हणजे भाजप
भाजप हा दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोर पळवणारा पक्ष आहे. त्यांना स्वतःची पोरं नाहीत. सर्व फोडलेली पोर आमची ते घेऊन ते बसले आहेत.
ही बातमी वाचा: