फडणवीस अर्धवट ज्ञानी, त्यांचा गुडघ्यात सु्द्धा मेंदू नाही; तुमच्या आरशात तुम्ही उघडे XXगडे दिसाल, पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Sanjay Raut on Devendra Fadnavis: तुम्ही फक्त एकच सांगा पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही? पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली, अशा शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला.

Sanjay Raut on Devendra Fadnavis: पाकिस्तानी विरोधात क्रिकेट खेळण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून कडून विरोध सुरू आहे. या विरोधावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जावेद मियाँदाद मातोश्रीवर आल्याची आठवण करून दिल्यानंतर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांवर घणाघाती प्रहार केला. फडणवीस अर्धवट ज्ञानी असून त्यांचा गुडघ्यात सुद्धा मेंदू नाही, भाजपवाल्यांना सुद्धा मेंदू नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी पलटवार केला. मियाँदाद मातोश्रीवर आला तेव्हा काय घडलं होतं ते दिलीप वेंगसरकर यांना विचारा, अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले.
पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली
संजय राऊत म्हणाले की, फडणवीसांनी ठाकरे चित्रपट पाहिला पाहिजे. ठाकरेंच्या तेव्हाच्या मुलाखती सुद्धा समजावून घेतल्या पाहिजेत. जावेद मियाँदाद मातोश्रीवर बाळासाहेबांना भारत पाकिस्तान क्रिकेटला विरोध करू नका हे सांगण्यासाठी आला होता. मात्र, बाळासाहेबांनी त्यांना चहा घ्या आणि निघून जा, दहशतवाद आणि क्रिकेट एकत्र चालणार नाही अशा शब्दात त्यांनी सांगितलं होतं. मात्र, मिस्टर फडणवीस मोदींप्रमाणे बाळासाहेबांनी शेपूट घातली नव्हती. जर तुम्हाला कुंकवाची कदर असेल, तर अशी विधाने करणार नाही अशा शब्दात संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. ते म्हणाले की तुम्ही आरशाची फॅक्टरी सुरु केली आहे. मात्र तुम्ही तुमच्या आरशामध्ये उघडे Xगडे दिसाल. तुम्ही फक्त एकच सांगा पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही? पैशासाठी तुम्ही पाकड्यांसमोर शेपूट घातली, अशा शब्दात राऊत यांनी हल्लाबोल केला.
मत चोरी करून मोदी सत्तेत
दरम्यान, मत चोरीवरून सुद्धा संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. ज्या लाडक्या बोगस बहिणींची मते विकत घेऊनच हे सरकार सत्तेत आल्याचं राऊत म्हणाले. ते म्हणाले की राज ठाकरेंनी निवडणुका झाल्यानंतर सुद्धा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी हा मतांचा प्रश्न विचारला. प्रकाश आंबेडकर यांनी याचिका सुद्धा दाखल केली. त्यामुळे या प्रश्नाचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. गेल्या आठ महिन्यांपासून मते गेली तरी कुठे हा प्रश्न अनुत्तरित असल्याचे राऊत म्हणाले. हे बहिणींनी कौल दिल्याचे सांगत आहेत, पण हे मत चोरी करून सत्तेत आल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी आता मुद्दा राष्ट्रीय स्तरावर हाती घेतला असून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा गेला आहे. मोदी मत चोरी करून सत्तेत आल्याचे ते म्हणाले. युगांडामध्ये ज्या पद्धतीने ईदी आमीन करत होता. इराकमध्ये सद्दाम हुसेन करत होता, पाकिस्तानात लष्करप्रमुख ज्या पद्धतीने निवडणूका जिंकतो, रशियात पुतीन जशा निवडणूका जिंकतो तशाच मोदींनी निवडणूका जिंकल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या























