Padma Awards : मित्रा, तुझा अभिमान वाटतोय; पद्मभूषण मिळाल्यानंतर शरद पवारांनी केलं वर्गमित्राचं अभिनंदन
Padma Awards : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्कर जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Padma Awards : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस पुनावाला यांचं कोरोनाकाळातलं काम आणि वॅक्सिन निर्मीतीत योगदान यासाठी त्यांना पद्मभूषण पुरस्कराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पुरस्कर जाहीर झाल्यानंतर पुनावालांचे मित्र आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
शरद पवार यांनी ट्वीट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. शरद पवार आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, मित्रा, तुझा अभिमान वाटतोय. औषध निर्मिती क्षेत्रातील योगदानासाठी सायरस पुनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
So proud of my batchmate Cyrus Poonawala for being awarded Padma Bhushan for the outstanding contribution in the field of medicine.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 25, 2022
ख्यातनाम उद्योगपती आणि सिरम संस्थेचे प्रमुख सायरस पुनावाला हे शरद पवारांचे खास मित्र. सायरस पुनावाला आणि शरद पवार हे दोघांचे शिक्षण पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयात झाले आहे. सायरस पूनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लसी तयार करण्यासाठी केला जातो. त्यातूनच सायरस पूनावाला हे लस निर्मितीच्या व्यवसायात उतरले आणि सीरम इन्स्टिट्यूटचा प्रवास सुरू झाला.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून एकूण 128 जणांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, सोनू निगम, विजयकुमार डोंगरे यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तर बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे.
पद्मविभूषण
- प्रभा अत्रे
- राधेशाम खेमका (मरणोत्तर)
- बिपीन रावत (मरणोत्तर)
- कल्याण सिंग (मरणोत्तर)
पद्मभूषण
- सायरस पुनावाला
- नटराजन चंद्रशेखरन
पद्मश्री
- विजयकुमार डोंगरे
- डॉ. हिम्मतराव बावस्कर
- सुलोचना चव्हाण
- सोनू निगम
- अनिल राजवंशी
- बालाजी तांबे (मरणोत्तर)
- भिमसेन सिंगल
महत्त्वाची बातम्या :
Padma Awards : 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर
Padma Awards : प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण तर सुलोचना चव्हाण यांना पद्मश्री, महाराष्ट्रातील 10 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव