एक्स्प्लोर

Omicron : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विमान प्रवाशांवर कठोर निर्बंध, सुधारित गाईडलाईन्स जारी

राज्य सरकारने सुधारित गाईडलाईन्स जारी केल्या असून त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि झिंबाब्वे या तीन देशांना हाय रिस्क या राष्ट्रांच्या लिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे.

मुंबई : राज्याने कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या गाईडलाईन्सवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आक्षेप घेतल्यानंतर आता राज्य सरकारने सुधारित गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. त्यामध्ये दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि झिंबाब्वे या तीन देशांना हाय रिस्क या राष्ट्रांच्या लिस्टमध्ये टाकण्यात आलं आहे. तसेच गेल्या 15 दिवसांत ज्या प्रवाशांनी परदेशी प्रवास केला असेल त्यांना सात दिवसांच्या विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. 

ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर हवाई प्रवाशांसाठी निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. 30 नोव्हेंबरला राज्य सरकारकडून खालील ओमायक्रॉन संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यांना ग्राह्य मानून त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार आहेत. या सुधारित गाईडलाईन्स खालीलप्रमाणे, 

1. भारत सरकारने लागू केलेले निर्बंध हे सर्व आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक प्रवाशांसाठी असतील.

2. पुढील देशांना हाय रिस्क नेशन्स जाहीर करण्यात आलं आहे - दक्षिण आफ्रिका, बोत्स्वाना आणि झिंबाब्वे

3. उच्च जोखीम असलेले राष्ट्रांचे वर्गीकरण करण्याचा निर्णय हा ओमायक्रॉन विषाणू आढळल्यानंतर सद्य परिस्थितीच्या आधारे घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाला आवश्यकतेनुसार त्याचे अद्ययावत करण्याचा अधिकार आहे.

4. खालील वर्गात मोडणाऱ्या हवाई प्रवाशांना हाय रिस्क असलेले प्रवासी म्हणून घोषित करण्यात येईल-
हाय रिस्क जाहीर केलेल्या राष्ट्रांमधून महाराष्ट्रात दाखल होणारे सर्व हवाई यात्रेकरू.
असे हवाई प्रवासी की ज्यांनी महाराष्ट्रात दाखल होण्याच्या अगोदर 15 दिवसात हाय रिस्क जाहीर केलेल्या राष्ट्रांना भेट दिलेली आहे.

5. भारत सरकारने पूर्वीच लादलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त केवळ हाय रिस्क असलेल्या हवाई प्रवाशांसाठी खालील निर्बंध ही लागू असतील:-
“हाय रिस्क असलेले हवाई प्रवाशांना प्राधान्यक्रमाने स्वतंत्र काउंटरवर उतरण्यासाठी वेगळी व्यवस्था तेथील विमानतळ व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत केली जाऊ शकेल. जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांच्या तपासण्या आणि विविध चाचण्या करणे सोपे व्हावे. अशा सर्व हाय रिस्क हवाई प्रवाशांना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल्यानंतर तात्काळ आरटीपीसीआर चाचण्या कराव्या लागतील आणि सात दिवस सक्तीच्या संस्थात्मक विलगीकरणात राहावे लागेल. त्यांची दुसरी आरटीपीसीआर चाचणी सात दिवसाच्या कालखंडानंतर करण्यात येईल.

या चाचणीत जर कोणीही पॉझिटिव्ह आढळलयास अशा हाय रिस्क प्रवाशांना कोविड उपचाराच्या सुविधा असलेल्या रुग्णालयात दाखल करण्यात येईल. जर सातव्या दिवशी घेतलेल्या आरटीपीसीआर चाचणीत त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास अशा हाय रिस्क असणाऱ्या हवाई प्रवाशांना सात दिवसांसाठी गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक असेल. 

6. इमिग्रेशन विभागाला निर्देश देण्यात आले आहे की, विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमानाद्वारे येणाऱ्या सर्व प्रवाशांना त्यांनी मागील पंधरा दिवसात ज्या- ज्या देशांना भेटी दिलेल्या आहे, त्यांची सविस्तर माहिती देणे बंधनकारक करावे.

7. त्याच प्रमाणे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) ला ही असे निर्देशित करण्यात आले आहे की, त्यांनी मागील पंधरा दिवसात हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती सर्व एयरलाईन्सकडे ही द्यावी. जेणेकरून या प्रवाशांच्या यात्रेसंबंधी माहितीची पडताळणी करणे सोपे होईल. प्रवाशांनी जर चुकीची माहिती दिल्याचे आढळलयास आपत्ती व्यवस्थापन कायदा -2005 च्या विविध कलमांखाली त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येईल.

8. देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्या सर्व यात्रेकरूंना पूर्णपणे लसीकरण केले असणे आवश्यक आहे. असे नसेल तर त्यांच्याजवळ आगमनाच्या 72 तासा अगोदरचे आरटीपीसीआर ‘निगेटिव्ह’ अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशाराSambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani :

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
Embed widget