एक्स्प्लोर

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी राज्य सरकारकडून जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्राचा आक्षेप

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना पत्र  लिहिले आहे.

मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं (Omicron Variant) जगाची धाकधूक वाढवली आहे. नवा व्हेरियंट ओमिक्रॉनमुळं संपूर्ण देश दहशतीखाली आहे. त्यानंतर प्रत्येक राज्यांनी सर्तकता बाळगण्यास सुरुवात केली आहे. राज्याने देखील कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सुधारीत गाईडलाईन्स जारी केल्या. त्यानंतर  केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास यांना पत्र  लिहिले आहे.  30 नोव्हेंबर रोजी राज्यानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सवाल उपस्थित केले आहे. 

आंतरराष्ट्रीय प्रवाशांकरीता राज्य सरकारकडून जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांवर केंद्राचा आक्षेप आहे. ओमिक्रॉनसंदर्भात केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्याची सूचना, सुधारीत नियम लागू करण्याचे आवाहन  करण्यात आले आहे.  राज्याच्या मार्गदर्शक सूचना इतर राज्याच्या गाईडलाईन्सशी साधर्म नसल्याचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. 

विमानतळावर देशांतर्गत प्रवाशांकरता मार्गदर्शक सूचना

विमानतळावर डोमेस्टिक प्रवाशांकरता 72 तासांपर्यंतचा आरटीपीसीआर  निगेटीव्ह रिपोर्ट दाखवणे बंधनकारक  आहे. यापूर्वी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखवावे लागत होते. मात्र आता मुंबई विमानतळावर 72 तासांपर्यंतचा कोविड निगेटीव्ह रिपोर्ट दाखवणे सक्तीचे आहे.  रिपोर्ट नसल्यास विमानतळावर कोविड टेस्ट केली जाणार आहे. यापूर्वीच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार, साऊथ आफ्रिका, रिस्क कंट्रीमधून येणा-या प्रवाशांचे सात दिवस संस्थात्मक क्वारंटाईन आणि त्यानंतर 14 दिवस होम आयसोलेशन असणार आहे. 

30 नोव्हेंबरला राज्य सरकारकडून खालील ओमिक्रॉन संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत : 

1. आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर आल्यानंतर आरटीपीसीआर करणं बंधनकारक, कोणत्याही देशाचा असला तरी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य

2. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची आरटी-पीसीआरचा चाचणी अहवाल निगेटीव्ह आला तरी देखील 14 दिवस होम क्वारंटीन राहावं लागणार 

3. मुंबईहून कनेक्टींग फ्लाईटकरीता देखील आरटीपीसीआर करणं बंधनकारक

4. महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक डॉमेस्टिक फ्लाईटमधील प्रवाशांना 48 तासाआधी आरटीपीसीआर चाचणी अहवाल करणं बंधनकारक

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

संबंधित बातम्या :

DGCA Guidelines : परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी DGCA च्या नव्या गाईडलाईन्स; 14 दिवसांचं सेल्फ डिक्लेरेशन अनिवार्य

Omicron : लसीचे दोन्ही डोस न घेणाऱ्या मॉल, रेस्टॉरंटमधील व्यक्तींना 10 हजारांचा दंड लागणार; मुंबई पालिकेचा निर्णय

Mahaparinirvana Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य सरकारकडून नियमावली जाहीर; घरातूनच बाबासाहेबांना अभिवादन करण्याचं आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule News : अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
Sanjay Raut on Disha Salian Case : दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 28 March 2025Disha Salian case : वडिलांच्या अफेअरने त्रस्त, दिशा सालियनने आर्थिक तणावातून जीवन संपवलं, नवीन माहिती समोरABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 28 March 2025Nashik Kumbhmela : सिंहस्थ कुंभमेळा पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर नावावरून वाद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule News : अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
अवघ्या दोन गुणांनी हुकली आर्मीत भरती होण्याची संधी, उच्च शिक्षित तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धुळ्यात हळहळ
Sanjay Raut on Disha Salian Case : दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
दिशाच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूआडून राजकारण करू नये, संजय राऊत कडाडले; आदित्य ठाकरेंचं नाव घेत म्हणाले...
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
पार्टीत पंजाबी गाणं मोठ्यानं लावलं, गर्लफ्रेंड म्हणाली, आवाज कमी कर अन् वाद वाढला; बॉयफ्रेंडला आला राग, थेट डोळ्यात गोळी घातली
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
अभियंत्याच्या घरावर छापा, नोटा मापण्यासाठी चार मशिन आणली, आठ तास फक्त बंडलांची मोजणी; कंत्राटदारांच्या निविदा काढण्यात मदत करत असल्याचा आरोप
Dhananjay Munde & Chhagan Bhujbal : धनंजय मुंडेंना अजितदादांनी चार हात लांबच ठेवलं, छगन भुजबळांपासूनही अंतर राखलं; विधिमंडळ समित्यांच्या नियुक्तीवरून चर्चांना उधाण
धनंजय मुंडेंना अजितदादांनी चार हात लांबच ठेवलं, छगन भुजबळांपासूनही अंतर राखलं; विधिमंडळ समित्यांच्या नियुक्तीवरून चर्चांना उधाण
IPL 2025 SRH Vs LSG: केशरी कळी खुललीच नाही, बिचारी काव्या मारन शेवटपर्यंत रडवेल्या चेहऱ्याने बसून राहिली; लखनऊने हैदराबादला लोळवलं
केशरी कळी खुललीच नाही, बिचारी काव्या मारन शेवटपर्यंत रडवेल्या चेहऱ्याने बसून राहिली; लखनऊने हैदराबादला लोळवलं
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ अखेर समोर आले, त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करतानाचे 15 व्हिडीओ अखेर समोर आले, त्या व्हिडिओमध्ये नेमकं काय?
Kunal Kamra & Sushma Andhare : मोठी बातमी : कुणाल कामरा, सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला; आजच नोटीस धाडण्याची शक्यता, दोघांच्या अडचणी वाढणार?
कुणाल कामरा, सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव स्वीकारला; आजच नोटीस धाडण्याची शक्यता, दोघांच्या अडचणी वाढणार?
Embed widget