एक्स्प्लोर

kirit somaiya : मुंबई पोलिसांकडून किरीट सोमय्यांना समन्स, छगन भुजबळांच्या संपत्तीची पाहणी केल्यामुळं समन्स आल्याचा सोमय्यांचा दावा

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना मुंबई पोलिसांनी समन्स बजावले आहे. छगन भुजबळ यांच्या संपत्तीची पाहणी केल्याने मला पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.  

kirit somaiya : मुंबई पोलिसांनी किरीट सोमय्या यांनी समन्स बजावले आहे. त्यानंतर सोमय्या हे मुंबईतल्या सांताक्रूझ पोलीस ठाण्यात हजेरी लावणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या संपत्तीची पाहणी केल्याने मला पोलिसांकडून समन्स बजावण्यात आले असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.  मी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे सोमय्या यांनी सांगितले. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ठाकरे सरकारमधील जे जे घोटाळेबाज आहेत. ज्यांनी ज्यांनी बेनामी संपत्ती जमवली आहे, ती जप्त करुन जनतेला परत देणार असल्याचे सोमय्या यांनी यावेळी सांगितले.

मला सांताक्रूझ पोलीस  ठाण्यात हजर व्हा म्हणून समन्स आले आहे. ताबडतोब हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. नाहीतर कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्या 100 कोटींच्या संपत्तीबाबत मुंबई उच्च न्यायालयात मी याचिका दाखल केली होती. त्याच्यामुळे भुजबळांवर कारवाई होऊन ते 2 वर्ष जेलमध्ये गेले होते असे सोमय्या म्हणाले. 4 सप्टेंबर 2021 ला ती संपत्ती बेनामी घोषीत होऊन ती जप्त करण्यात आली होती. त्याच्या पाहणीसाठी किरीट सोमय्या गेले होते आणि त्यासाठी महाशय उद्धव ठाकरे आज मला जेलमध्ये पाठवण्याची भाषा करत आहेत. मी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे सोमय्या यांनी सांगितले. महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी ठाकरे सरकारमधील जे जे घोटाळेबाज आहेत, ज्यांनी ज्यांनी बेनामी संपत्ती जमवली आहे, ती जप्त करुन जनतेला परत देणार असल्याचे सोमय्या यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, किरीट सोमय्यांना सांताक्रुज पोलीस ठाण्यातून आलेली नोटीस ही कोरोनाची नियमावली असताना गर्दी जमवल्याप्रकरणी आली आहे. त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आपलं म्हणणं स्पष्ट करण्यासंदर्भात हजर राहण्याचे आदेश त्यामध्ये आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती की किरीट सोमय्या यांना एका आठवड्यात जेलमध्ये जाव लागेल. सेनेचे प्रवक्ते संजय राऊत सांगतात की बाप लेक जेलमध्ये जातील. मात्र, आम्ही घाबरत नसल्याचे सोमय्या म्हणाले. छगन भुजबळ यांच्याविरोधात याचिका केली होती म्हणून, भुजबळ दोन वर्ष जेलमध्ये जाऊन आले. मी जेलमध्ये जाण्यास बिलकुल घाबरत नाही असेही सोमय्या म्हणाले.

जी कंपनी ब्लॅकलिस्ट करण्यात आली होती, त्या कंपनीला कशी कंत्राट देण्यात येतात, असा सवालही सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. शिवराळ भाषेचा वापर करून विषय डायव्हर्ट करण्यात येत आहे. पण मी डायव्हर्ट होणार नाही, माझं लक्ष घोटाळेबाजांकडेच राहील असे सोमय्या यावेळी म्हणाले. ईडी संदर्भात जे संजय राऊत बोलतात त्या संदर्भात मी पत्रकार परिषद घेणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. संजय राऊत एवढे घाबरले आहेत की ते इतरांचा बाप काढत आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांना 19 बंगल्यांचा हिशोब द्यावा लागेल असेही सोमय्या यावेळी म्हणाले. माझ्याकडून कोणताही त्रास अन्वय नाईक कुटुंबियांना होत नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या:

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 21 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaSanjay Raut : पटोलेंना मुख्यमंत्री करायचं असेल तर काँग्रेसने घोषणा करावी - संजय राऊतAdani Shares dropped : अदानी ग्रीन एनर्जीचे शेअर्स 17.5 टक्क्यांनी कोसळले9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 21 नोव्हेंबर  2024 : ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
एक्झिट पोल काहीही असो, महायुतीच्या 160 पेक्षा जास्त जागा घासून नाही तर ठासून येणार, अजित पवार गटाच्या नेत्याला विश्वास
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट!
Maharashtra Election Exit Poll 2024: मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, बुथ लेव्हलच्या एक्झिट पोलचा निकाल?
मतदान संपताच भाजपने ग्राऊंड लेव्हलवरुन माहिती मागवली, ठाकरेंना मोठा धक्का
Share Market : शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, कारण समोर
शेअर बाजारात तुफान घसरण; अदानींचे सर्वच शेअर गडगडले, गुंतवणूकदारांना फटका
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
राज्यातील 15 मतदारसंघांमध्ये रेकॉर्डब्रेक मतदान, प्रस्थापितांचा टांगा पलटी होणार?
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
महाराष्ट्रात ठाकरेंचं सरकार की भाजपचं? कोण होणार पुढचा मुख्यमंत्री? प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित
Mahim Vidhan Sabha: माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
माहीम मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला; धक्कादायक आकडेवारी आली समोर, ठाकरे, सरवणकर की सावंत?
Dhananjay Munde: धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
धनंजय मुंडेच्या परळीत जोरदार राडा, EVM मशीन फोडल्या, 40 जणांवर गु्न्हे दाखल, परळीत गेम फिरणार?
Embed widget