News
News
टीव्हीabp shortsABP शॉर्ट्सव्हिडीओ पॉडकास्ट
X

मराठा आरक्षणासाठी गोदावरीत उडी मारणारा काकासाहेब शिंदे कोण होता?

मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला.

FOLLOW US: 
Share:
मुंबई: मराठा आरक्षण मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज  24 जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.  मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र पाटील यांनी ही घोषणा केली. मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करुन त्यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत मेगाभरती रोखावी, स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी केल्या आहेत. काकासाहेब शिंदे कोण होते? काकासाहेब दत्तात्रय शिंदे औरंगाबादमधील गंगापूर तालुक्यातील कायगाव कानट गावचे रहिवासी शिक्षण - दहावी औरंगाबादमधील मराठा मोर्चापूर्वी प्रत्येक मराठा मोर्चात सहभागी आई-वडील शेतकरी, एक एकर शेती. त्यावरच कुटुंबाची गुजराण लहान भाऊ अविनाश शिंदेचं अद्याप शिक्षण सुरु आहे. काकासाहेब शिंदे घरातील एकमेव कमावते होते. ते ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. काकासाहेब शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. युवा सेना जिल्हाध्यक्ष संतोष माने यांच्या कारवर काकासाहेब शिंदे ड्रायव्हर म्हणून कार्यरत होते. काल दुपारी जलसमाधी आंदोलनात काकासाहेब शिंदे सहभागी होते. सर्व आंदोलकांनी जलसमाधीसाठी धाव घेतली होती, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र काकासाहेब शिंदे निसटून त्यांनी गोदावरी नदीत उडी मारली. सरकारकडून दहा लाखांची मदत दरम्यान, सरकारकडून काकासाहेब शिंदे यांच्या नातेवाईकांना दहा लाख रुपये आणि भावाला आठवडाभरात सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच काकासाहेब शिंदे मृत्यूप्रकरणी गंगापूरचे तहसीलदार चंद्रकांत शेळके आणि पोलीस निरीक्षक सुनील बिर्ला या दोघांना निलंबित करण्यात आलं आहे. संबंधित बातम्या  औरंगाबादेत गोदावरीत उडी मारलेल्या मराठा आंदोलकाचा मृत्यू   LIVE मराठा क्रांती मोर्चाकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक 
Published at : 24 Jul 2018 10:18 AM (IST) Tags: Kakasaheb Shinde maratha kranti Morcha CM Devendra Fadnavis aurangabad Maharashtra

आणखी महत्वाच्या बातम्या

शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली, 53 वर्षांपासून साथ; शरद पवारांचे P.A. तुकाराम भुवाळी यांचं निधन

शेवटच्या श्वासापर्यंत जबाबदारी सांभाळली, 53 वर्षांपासून साथ; शरद पवारांचे P.A. तुकाराम भुवाळी यांचं निधन

Devendra Fadnavis : मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा फुटला, देवेंद्र फडणवीस रागावले; कुणीही असो, कारवाई करण्याचा इशारा

Devendra Fadnavis : मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा फुटला, देवेंद्र फडणवीस रागावले; कुणीही असो, कारवाई करण्याचा इशारा

रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री, भाजपकडून महिला नेत्याला संधी; नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी

रेखा गुप्ता दिल्लीच्या मुख्यमंत्री, भाजपकडून महिला नेत्याला संधी; नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत शपथविधी

मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?

मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; करुणा शर्मा थेट सुप्रिया सुळेंच्या भेटीला, दोघांमध्ये काय चर्चा?

शिवसेनेचं मिशन टायगर तुतारीच्या दिशेने? शरद पवारांच्या आमदाराकडे शिवसेना मंत्र्यांचे भोजन, म्हणाले, ताकद देऊ...

शिवसेनेचं मिशन टायगर तुतारीच्या दिशेने? शरद पवारांच्या आमदाराकडे शिवसेना मंत्र्यांचे भोजन, म्हणाले, ताकद देऊ...

टॉप न्यूज़

नगरसेवक ते मुख्यमंत्री... विधानसभेला 2 वेळा पराभूत, विद्यार्थी संघटनेपासून भाजपात; कोण आहेत रेखा गुप्ता?

नगरसेवक ते मुख्यमंत्री... विधानसभेला 2 वेळा पराभूत, विद्यार्थी संघटनेपासून भाजपात; कोण आहेत रेखा गुप्ता?

Chhatrapati Sambhajiraje : जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....

Chhatrapati Sambhajiraje : जयंतीला श्रद्धांजलीचं ट्विट, राहुल गांधींवर राज्यभरातून टीकेची झोड; छत्रपती संभाजी राजेंचाही सवाल, म्हणाले....

कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

कुठल्याही गोष्टीला लिमीट असतं, मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री बसून निर्णय होईल; मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

Delhi CM : भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला

Delhi CM : भाजपनं पॅटर्न अखेर बदलला, दिल्लीत मुख्यमंत्रीपदावर महिला विराजमान होणार! आरएसएसने दिला प्रस्ताव अन् भाजपनं स्वीकारला