Manoj Jarange : मराठा आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा 'दबाव', अजित पवारांच्या दोन मंत्र्यांचे षडयंत्र : मनोज जरांगे
Manoj Jarange Patil : मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी देवेंद्र फडणवीसांचा दबाव असण्याची शक्यता आहे, अजित पवारांच्या दोन तीन मंत्र्यांचही त्यामागे षडयंत्र असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
![Manoj Jarange : मराठा आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा 'दबाव', अजित पवारांच्या दोन मंत्र्यांचे षडयंत्र : मनोज जरांगे Manoj Jarange Patil allegation on Devendra Fadnavis said he is pressuring with ajit pawar minister chhagan bhujbal on maratha reservation Manoj Jarange : मराठा आरक्षण मिळू नये म्हणून फडणवीसांचा 'दबाव', अजित पवारांच्या दोन मंत्र्यांचे षडयंत्र : मनोज जरांगे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/02/eadc631293a770ca97771ecf2dc329f91709367814393737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Manoj Jarange On Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसतंय. आधी मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक युद्ध पेटल्यानंतर मनोज जरांगे यांनी आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. सोबत अजित पवार यांच्या दोन मंत्र्यांवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.
मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मनोज जरांगे यांनी यावेळी अत्यंत गंभीर आरोप केलाय आणि त्यामुळे महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली आहे. मराठा आरक्षण मिळू नये म्हणून राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दबाव टाकल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला. इतकंच नाही तर अजित पवार यांच्या दोन ते तीन मंत्र्यांनी मराठा आरक्षणाविरुद्ध षडयंत्र रचल्याचाही आरोप त्यांनी केला.
कुणाचा दबाव, कुणाचं कारस्थान?
मनोज जरांगे यांनी फडणवीस आणि अजित पवारांच्या मंत्र्यांवर आरोप केल्यानंतर सत्ताधारी नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस यांच्या काळातच मराठा आरक्षण दिलं होतं असं शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले. तर कुणी कुणावर दबाव टाकत नाही, शब्द पाळणार सरकार असल्याचं शिंदे गटाचे संजय शिरसाट म्हणाले.
बारामतीतून फोन आल्यानंतर विरोधकांचा बहिष्कार
दरम्यान, आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने बोलवलेल्या बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचाही मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. यावरून छगन भुजबळांनी शरद पवारांचं नाव न घेता निशाणा साधलाय. तर विरोधकांनी भुजबळांना धारेवर धरलंय.
विरोधकांचे भुजबळांना प्रत्युत्तर
बारामतीहून फोन आला आणि आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केला. महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरू आहेत असाही आरोप त्यांनी केला. तर भुजबळ खोटं बोलत आहेत, पवार साहेबांना मी कसा घेऊन जाणार असं विजय वडेट्टीवार म्हणाले. भुजबळ साहेबांसारख्या प्रगल्भ विचाराच्या नेत्यांनी हे इतकं बालिश वक्तव्य करणं शोभत नसल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली.
एकूणच, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या दोन मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेत. त्यामुळे मनोज जरांगे यांनी दिलेला आल्टिमेटम आणि केलेल्या आरोपांनंतर सरकार कसा मार्ग काढतं हे बघायला हवं.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)