सावधान! राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार, अतिवृष्टी होणार, नदी नाले वाहणार, जाणून घ्या पंजाबराव डखांचा हवामान अंदाज
हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, कालपासून म्हणजे 4 जूनपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. सध्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही भागात पावसानं उगडीप दिली आहे.

Maharashtra Rain : हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, कालपासून म्हणजे 4 जूनपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. सध्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही भागात पावसानं उगडीप दिली आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दरम्यान, अशातच राज्यातील 26 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Punjabrao Dakh) यांनी दिली आहे. आज वादळी वारे, विजा आणि मध्यम पर्जन्याची शक्यता आहे.
कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस?
1. कोकण विभाग
ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी
हलका ते मध्यम पाऊस .
2. पश्चिम महाराष्ट्र
पुणे, सातारा, सांगली, सोलापूर
घाटभागात वाढलेला पर्जन्य अंदाज .
3. मराठवाडा व विदर्भ
नाशिक, धुळे, जळगाव, अमरावती, नागपूर, वर्धा
विजेसह मध्यम पाऊस, वाऱ्याचा वेग 30 ते 50 किमी/तास .
4. अलर्ट नसलेले जिल्हे
गोंदिया, भंडारा, नंदुरबार, लातूर - कोरडे हवामान .
7 ते 10 जूनच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 7 ते 10 जूनच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांचे 10 जून पर्यंत शेत नाही तयार झाले तर 10, 11 आणि 12 जून तीन दिवस शेत तयार करायला पुन्हा चान्स मिळेल. राज्यात 13 ते 18 जून मुसळधार पाऊस पडणार आहे. ठिकठिकाणी वढे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे.
13 जून ते 18 जूनच्या दरम्यान खूप मुसळधार पाऊस पडणार
पूर्व विदर्भ, पश्चिमी विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश, मराठवाडा सगळ्या विभागामध्ये 7, 8, 9 जून दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे. पण त्याच्यानंतर 13 जून ते 18 जूनच्या दरम्यान खूप मुसळधार पाऊस पडणार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होईल. म्हणजे वढे नाले वाहतील असा पाऊस पडणार आहे.
गेल्या काही दिवसापासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. काही भागात अतिवृष्टी देखील झाली आहे. नदी नाले दुधतडी भरुन वाहत आहेत. दरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. तसेच काही भागात जास्त पाऊस पडल्यामुळं शेती पिकांचे देखील नुकसान झाले आहे. अशातच पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Weather Update : कोकण किनारपट्टीवर काळ्याकुट्ट ढगांची गर्दी, अरबी समुद्र खवळणार; अतिवृष्टीचा रेड अलर्ट, पुढील दोन दिवस कसं असेल हवामान?























