(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray Speech Highlights : गोमूत्रधारी हिंदुत्व, लोकशाहीची दहीहंडी, संघाला सवाल; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Uddhav Thackeray Speech Nagpur: नागपूर येथील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे...
Uddhav Thackeray Speech Nagpur: नागपूर येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे सरकारवर तुफान हल्ला चढवला. यावेळी त्यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसोबत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. जाणून घ्या उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे:
- देशातील गल्लीबोळात घराणेशाही बोलणाऱ्या गृहमंत्र्यांना समाजसेवा करणाऱ्या घराण्यासमोर झुकावं लागलं.
- आप्पासाहेब धर्माधिकारींचे काम मोठं आहे. ते व्यसनमुक्तीचे काम करतात. दारूची नशा घर उद्ववस्त करते, सत्तेचे व्यसन देश उद्धवस्त करते.
- निवडणुकीआधी आघाडी होते आणि त्यांची सभा होते. पण या मविआच्या सभा या सत्तेनंतर सुरू आहेत. आम्ही कारभार व्यवस्थित केला नसता तर तुम्ही सभांना प्रचंड प्रतिसाद दिला नसता.
- राज्यात अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. अवकाळीमुळे शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असताना मुख्यमंत्री हे देवदर्शनाला गेले. पंचनामा करायला अधिकारी जात नव्हते
- आम्ही सातत्याने राम मंदिरासाठी कायदा तयार करावा, अशी मागणी केली होती. त्यावेळी मोदी सरकारकडून कोणतीही भूमिका घेतली गेली नाही. राम मंदिराच्या कायद्याबाबत शांत बसले होते. राम मंदिराबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर श्रेयासाठी टिकोजीराव फणा काढून बसले.
- आम्ही घरात बसून चांगलं काम केले. राज्याच्या मुख्यमंत्र्याचे नाव सर्वोत्कृष्ट पाच मुख्यमंत्र्यांच्या यादीत होते. नुसतं वणवण फिरला म्हणजे काम करतो, असे होत नाही.
- बाबरी मशिदीबाबत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचा अपमान केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ही पाटील यांची भूमिका मान्य आहे का?
- आमचं हिंदुत्व हे शेंडी, जानव्याचं हिंदुत्व नाही. त्यांचे हिंदुत्व हे गोमुत्रधारी हिंदुत्व आहे. भाजपने त्यांचं हिंदुत्व काय आहे हे सांगावं
- सरसंघचालक मोहन भागवत मशिदीत जाऊन आले. मी गेलो असतो तर काय केलं असतं भाजपने...
- आम्ही आलो मैदानात...तुम्हीदेखील मैदानात या...तुमचा कोण बाप निवडायचा आहे तो निवडा... मी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने निवडणुकीच्या मैदानात उतरतो.
- रोशनी शिंदेवर हल्ला केला... उपचार घेत असताना तिला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला. गृहमंत्र्यांना फडतूस नाही तर आणखी काय शब्द वापरावा?
- ही काय लोकशाहीची दहिहंडी आहे का...दिसली हंडी की फोड...विरोधकांची सत्ता पाडायची कामे सुरू आहेत.
- देशात सगळीकडे आलबेल सुरू असल्याचे चित्र तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.