एक्स्प्लोर

OBC Reservation Hearing Live Update : राज्य सरकारला मोठा धक्का; ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

OBC Reservation LIVE Updates : ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाचा निकाल अपेक्षित, राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांचं भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ठरणार

LIVE

Key Events
OBC Reservation Hearing Live Update : राज्य सरकारला मोठा धक्का; ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Background

OBC Reservation : ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार असून निवडणुकीबाबत न्यायालय आज काय निर्णय देणार? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं याआधी दोनदा स्थगिती दिली आहे. इम्पिरिकल डेटा गोळा करूनच आरक्षण देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं याआधीही दिले होते. त्यावरूनच तिढा निर्माण झाला आहे. न्यायालयानं ओबीसी आरक्षणाला स्थगिती दिल्यानं ओबीसी आरक्षित जागा वगळून अन्य वॉर्डातील निवडणुका होत आहेत. सरकारनं या निवडणुका एकतर एकत्र घ्याव्यात किंवा पुढे ढकलाव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काल न्यायालयात युक्तीवाद झाला आणि आजही होणार आहे. त्यानंतर न्यायालय काय निर्णय देतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.  

ओबीसी आरक्षणासंदर्भातली (OBC Reservation) प्रकरणात कालही सुनावणी पूर्ण झालेली नाही. आज (15 डिसेंबर) सकाळी 11 वाजता पुढची सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारनं डेटा उपलब्ध करून द्यावा याबाबत राज्य सरकारचा युक्तिवाद आहे. निवडणुकांबाबतही कालच्या सुनावणीत युक्तिवाद झाला असून उरलेला युक्तिवाद आता आजच्या सुनावणीत होणार आहे. 

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारसह एकूण तीन हस्तक्षेप याचिकांवरील सुनावणी आज (मंगळवारी) होणार होती. ओबीसी आरक्षणाबाबत अन्य राज्यांचा नियम महाराष्ट्रालाही लागू करा, अन्यथा सर्वच निवडणुका पुढे ढकलून इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी मुदत द्या, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. तसंच केंद्र सरकारकडे उपलब्ध असलेला डेटा राज्याला उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली. निवडणूक आयोगाने राज्यातील 105 नगरपंचायतीमधील ओबीसी प्रभागातील निवडणुकीला स्थगिती दिली आहे. येत्या 21 डिसेंबरला यासाठी मतदान होणार आहे. फेब्रुवारीमध्ये 23 महापालिका, 25 जिल्हा परिषदा, 299 पंचायत समित्या, 285 नगर परिषदांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील होऊ घातलेल्या ओबीसी संवर्गातील जागेवरील निवडणुकीला राज्य निवडणूक आयोगाकडून स्थगिती मिळाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राज्यातील 106 नगरपंचायत मध्ये 1802 जागांसाठी निवडणूक होणार होती. आता त्यापैकी ओबीसींच्या 400 जागांच्या निवडणुकीला स्थगिती मिळणार आहे.

मध्यप्रदेश तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांच्या देखील याचिका आहेत. त्या एकत्रित चालवण्यात येत आहेत. इम्पिरीकल डेटा बाबत देखील याचिका दाखल झालेली आहे.याबाबत देखील आज कोर्टात सुनावणी पार पडलीतुषार मेहता यांनी सांगितलं की,  जो डेटा राज्य सरकार मागत आहे तो ओबीसीचा डेटा नाही. त्यामुळे देता येत नाही. मात्र राज्य सरकारच्या वकिलाने सांगितलं की, तो वेगवेगळ्या जातींचा आहे. त्यामधील ओबीसी जाती आम्ही शोधून तो घेतो अशी चर्चा पार पडली. याबाबत आता कोर्टाने सांगितलं की, आधी इम्पिरीकल डेटा बाबत जी सुनावणी आहे. ती पाहू. यावेळी ही बाब देखील नमूद करण्यात आली की हा डेटा सदोष आहे. आता हा डेटा द्यायचा की नाही याबाबत सुनावणी आहे. यासोबतच दुसरी जी मागणी होती की निवडणूक पुढे ढकलण्याबाबत ती उद्या सुनावणी पार पडेल, असं भुजबळ म्हणाले. राज्य सरकार ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांशी भुजबळ यांनी दिल्ली दौरा करत चर्चा केली होती.

14:34 PM (IST)  •  15 Dec 2021

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का, ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

13:01 PM (IST)  •  15 Dec 2021

OBC Political Reservation : सुप्रीम कोर्टाची सुनावणी दोन वाजेपर्यंत स्थगित

ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्यी सुनावणी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. दुपारच्या सत्रात निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्ट आदेश देण्याची शक्यता आहे.

12:38 PM (IST)  •  15 Dec 2021

इम्पिरिकल डेटा म्हणजे काय? हा डेटा कसा गोळ करतात?

राज्य सरकारला मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारची इम्पिरिकल डेटा मागणीची याचिका फेटाळली आहे. पण इम्पिरिकल डेटा म्हणजे नेमकं काय? जाणून घेऊया सविस्तर 

12:33 PM (IST)  •  15 Dec 2021

...म्हणून इम्पिरिकल डेटा मागणीची राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली

2011 च्या जनगणनेतून तयार झालेला सामाजिक-आर्थिक मागासलेपणाचा तपशील Empirical Data सार्वजनिक होणार नाही, म्हणजेच राज्य सरकारला मिळणार नाही. जातीनिहाय जणगणना ओबीसींची लोकसंख्या मोजण्यासाठी झालेली नव्हती तर देशातील मागासलेपणाची स्थिती समजण्यासाठी झाली होती. तसंच त्यात अनेक त्रुटी. त्यामुळे हा डेटा नव्याने आरक्षणाचे निकष ठरवण्यासाठी वापरले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात इंपिरिकल डेटा देण्याचे निर्देश देण्यासाठी दाखल केलेली याचिका आज फेटाळण्यात आली आहे. 

12:30 PM (IST)  •  15 Dec 2021

Maharashtra OBC Reservation Update : राज्य सरकारला मोठा झटका, सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारची इम्पिरिकल डेटा मागणीची याचिका फेटाळली

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीतAiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणारABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 07 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget