एक्स्प्लोर

लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकेच्या कोणत्या खात्यात येणार? आधारकार्ड नंबर टाकून चेक करा

या योजनेचे पैसे थेट महिलेच्या बँक खात्यात जमा होणार असे सांगण्यात आले आहे. मात्र, हे पैसे नक्की कोणत्या खात्यात जमा केले जाणार आहेत? एकदा चेक करा..

Ladki Bahin Yojna: राज्य शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी योजनेसाठी (Ladki Bahin Yojna) राज्यभरातून अर्ज दाखल करण्यात आले असताना लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये येणार असल्याचे सांगण्यात आले. तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील महिला या योजनेचा लाभ घेत असाल तर हे पैसे नक्की कोणत्या खात्यात येणार हे तुम्हाला फक्त आधारकार्ड नं टाकून महाडिबीटीवर पाहता येणार आहे.

शासनाकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना थेट लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आलं आहेत. या योजनेचे पैसे थेट महिलेच्या बँक खात्यात जमा होणार असे सांगण्यात आले आहे. मात्र, हे पैसे नक्की कोणाच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. अनेक लाभार्थी महिलांना ही रक्कम कोणत्या खात्यात जमा होणार आहे. याविषयी संभ्रम आहे. तुमच्याकडे बँकखाते क्रमांक नसेल तर  तुम्हाला तुमच्या आधार कार्ड क्रमांकावरूनही ही रक्कम तपासता येणार आहे.

तुमचे पैसे आधारकार्डवरून येणार आहेत!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे हे डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रणालीच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. म्हणजेच तुमचा आधार क्रमांक वापरून वापरून तुमच्या बँक खात्यावर ही रक्कम येणार आहे. यासाठी कोणतीही बँक डिटेल्स तपासले जाणार नाही. कारण डीबीटी प्रणालीअंतर्गत एकाचवेळी मोठ्या प्रमाणात खात्यात रक्कम पाठविण्यात येते. यासाठी तुमचे आधारकार्ड नक्की कोणत्या बँकेला लिंक केले आहे हे तुम्हाला तपासण्याची आवश्यकता आहे.

कोणत्या बँकेला आधारकार्ड जोडलंय तपासा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अर्ज केलेल्या बऱ्याच जणांकडे एकाहून अनेक अकाऊंट असल्याने नक्की कोणत्या बँक खात्यात आपली रक्कम जमा होणार आहे याबाबत संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतू डीबीटीमार्फत पैसे घेण्यासाठी तुम्हाला कोणत्यातरी एकाच बँक अकाऊंटला आधारकार्ड लिंक करता येते. 

  • सर्वप्रथम येथे या संकेतस्थळावर जा.
    https://myaadhaar.uidai.gov.in/
  • यात तुमचा १२ अंकी आधारकार्ड क्रमांक टाकून लॉगइन करा.
    आधार क्रमांक टाकल्याने तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल. तो भरल्यानंतर त्यावर Bank Seeding Status असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा
  • यात तुमच्या आधारकार्डचे शेवटचे चार अंक दिसतील. आणि बँकेचे नाव दिसेल. आणि तुम्हाला तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे कळेल.
  • आधारकार्ड ज्या बँकेला लिंक आहे, त्याच खात्यावर लाभार्थी महिलेचे पैसे येणार आहेत.

हेही वाचा:

लाडकी बहीण अर्जात चूक झाल्यास लाभ मिळेल का? झालेली चूक दुरुस्त करता येते का? जाणून घ्या सविस्तर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, अमरावती, भिवंडीतून तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
Devendra Fadnavis: मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis meet PM Narendra Modi : देवेंद्र फडणवीसांनी घेतली मोदींची भेटCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :  12 डिसेंबर 2024:  ABP MajhaRohit Pawar on Ajit Pawar : राजकारणापलिकडचे संबंध, हीच तर आपली चांगली संस्कृतीYugendra Pawar on Sharad Pawar : ही भेट कौटुंबिक, कुटुंब एकत्र आलं पाहिजे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Meets Amit Shah : अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
अमित शाहांच्या भेटीनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिली महत्त्वाची अपडेट, म्हणाले...
Sharad Pawar Birthday : वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
वाढदिवसाला शरद पवारांभोवती दुरावलेल्या आप्तेष्टांचा गोतावळा जमला, अजित पवारांच्या मुलाचं ट्विट, म्हणाला....
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, अमरावती, भिवंडीतून तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
धक्कादायक! गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानी संघटनेशी संपर्कात, NIAची मोठी कारवाई, तरुणास रात्रीतून घेतले ताब्यात
Devendra Fadnavis: मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
मोदीजी आमच्यासाठी पितृतुल्य, आमचे पालक; पंतप्रधानांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Suresh Dhas On Massajog Crime: या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
या गुन्हेगारांचे जे कोणी आका असतील त्यांना आवरा, मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस म्हणाले..
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात तेजी, गुंतवणुकीची चांगली संधी...
Gold Silver Rate : लोकल  ते ग्लोबल, सोन्याचे दर घसरले, गुंतवणुकीची चांगली संधी...
Sharad Pawar & Ajit Pawar : शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
शरद पवार-अजित पवारांनी एकत्र यायलाच हवं, दिल्लीतील भेटीनंतर बड्या नेत्याने कारण सांगितलं
Sharad Pawar:  शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
शरद पवार-अजित पवारांची दिल्लीत भेट, युगेंद्र म्हणाले, पुढचा पाडवा एकत्र करु, रोहित म्हणतात..
Embed widget