एक्स्प्लोर

राज्यात पुन्हा मास्क सक्ती? लवकरच निर्णयाची शक्यता; आज मुख्यमंत्र्यांची राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

Maharashtra Corona cases Mask : राज्यात पुन्हा मास्कसक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे.  कारण कोविड टास्क फोर्सनं चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे.

Maharashtra Corona cases Mask Compulsion :   देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. दिल्लीसह कर्नाटक, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्येही मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. तसंच पंजाब सरकारनं देखील लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा असा सल्ला दिला आहे. आता महाराष्ट्रात देखील मास्क सक्ती करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर राज्य सरकारनं महाराष्ट्र मास्कमुक्तीची घोषणा केली होती. मास्कचा वापर ऐच्छिक करण्यात आला. मात्र राज्यात पुन्हा मास्कसक्ती केली जाण्याची दाट शक्यता आहे.  कारण कोविड टास्क फोर्सनं चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे, मॉल्स अशा गर्दीच्या बंदिस्त ठिकाणी मास्क वापराची सक्ती लागू करण्याचा सल्ला दिला आहे. कोरोना विषाणूचा पुन्हा वाढता प्रभाव हा चिंतेचा विषय असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अस मत ज्येष्ठ डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत व्यक्त केलं आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत सर्व मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मास्कसक्तीसंदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. 

केंद्र सरकार सतर्क, पंतप्रधान मोदींचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद 

देशात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास होणाऱ्या ऑनलाईन बैठकीत मोदी देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेतील. देशात कोरोना रुग्णांचा कमी झालेला धोका पुन्हा वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज ही बैठक घेणार आहेत.

गेल्या दोन आठवड्यांत देशात कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांव्यतिरिक्त, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया आणि त्यांच्या संबंधित मंत्रालयांचे अधिकारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण हे कोविडची सद्यस्थिती, लसीकरणाची व्याप्ती, विशेषत: बूस्टर ड्राइव्ह आणि काही राज्यांमधील प्रकरणांचा मार्ग यावर सादरीकरण करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

देशातील लोकांना आणखी एक बूस्टर डोस?
या कोविड आढावा बैठकीत पंतप्रधान मोदी राज्यांना देशातील लोकांना आणखी एक बूस्टर डोस मोफत देण्याचे आवाहन करू शकतात. दरम्यान, कोविड संदर्भात पीएम मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. देशातील कोविडची परिस्थिती समजून घेण्यासाठी पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच मुख्यमंत्री आणि जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

Corona : देशात पुन्हा कोरोनामुळे धोक्याची घंटा; जाणून घ्या कोणत्या राज्यांमध्ये किती वाढली रुग्णांची संख्या?

Maharashtra Corona Update : राज्यात मंगळवारी 153 कोरोना रुग्णांची नोंद तर अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 943 वर

Modi Govt 8 Year: मोदी सरकारला आठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त मोठ्या जल्लोषाची तयारी, जाणून घ्या काय आहे प्लान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP MajhaAjit Pawar Meet Sharad Pawar : काका-पुतण्या भेट, परिवर्तन घडणार?D Gukesh World Chess Championship : चायनीज ग्रँडमास्टरला 'चेक मेट'; डी. गुकेश बुद्धिबळाचा 'राजा'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
धक्कादायक ! पुण्यात गॅस शेगडीवरील लायटरचा स्फोट, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
परवीन बाबी ते मीना कुमारी! 9 बॉलीवूड सेलिब्रिटी जे गर्भश्रीमंतीतून थेट रस्त्यावर आले; चेहरा सुद्धा ओळखेना
Places Of Worship Act : तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
तोपर्यंत देशभरातील दिवाणी न्यायालयांना प्रार्थनास्थळांना आव्हान देणाऱ्या खटल्यांवर कारवाई करण्यास मनाई; सुप्रीम कोर्टाचे निर्देश
Embed widget