एक्स्प्लोर

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर, पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांची भेट घेणार  

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्यापासून दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.

Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) हे दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) यांची भेट घेणार आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या या दौऱ्यासाठी निघणार आहेत. एकनाथ शिंदे यांचा दिल्लीत एक दिवस मुक्काम असेल. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी ते संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतील. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला येतील. पुण्याहून मुख्यमंत्री  पंढरपूरला जाणार आहेत. तेथे त्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त विठ्ठलाची पूजा होईल.  तेथून ते मुंबईला परतील, अशी माहिती मिळाली आहे. 

एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर आपल्या दालनात प्रवेश करुन कामकाजाला सुरूवात केली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने कामकाजाला सुरुवात केली होती. परंतु, आज प्रथमच मुख्यमंत्री राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील आपल्या दालनात दाखल झाले. मुख्यमंत्री मंत्रालयातील दालनात येणार म्हणून आज आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यानंतर रितसर पूजा पार पडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कामकाजास सुरुवात केली. 

मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळातील पहिल्याच भाषणात एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगितले होते. पहाडासारखे आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, असे अमित शाह यांनी सांगितल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले होते. त्यानंतर आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोघांना भेटणार आहेत. त्यामुळे या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.  

महत्वाच्या बातम्या

Eknath Shinde : स्वागत, सजावट आणि पूजा... मंत्रालयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कामकाजाला प्रारंभ

Maharashtra : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, 'मविआ' सरकारने केलेल्या बदल्या रोखल्या  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget