(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : राज्यातील 26 आयटीआयला आता महापुरुषांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचा निर्णय, कोणत्या आयटीआयला कुठलं नाव? जाणून घ्या
ITI : राज्यातील 26 शासकीय आयटीआय संस्थांच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, तसेच समाजसुधारकांची नावे देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
मुंबई : सद्यःस्थितीत राज्यात 499 शासकीय आणि 585 खासगी आयटीआय कार्यरत आहेत. राज्यातील 26 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) नावात बदल करण्यास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी हा निर्णय घेतला आहे.
राज्यात शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण देण्यात येते. युवकांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविणे आणि खासगी औद्योगिक आस्थापनांना लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे, असा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील 26 शासकीय आयटीआय संस्थांच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती, तसेच समाजसुधारकांची नावे देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
यात ठाण्यातील आयटीआयला राजमाता जिजाऊ, औंध येथील आयटीआयला छत्रपती शिवाजी महाराज, पुणे आयटीआयला सावित्रीबाई फुले, रत्नागिरी आयटीआयला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, जळगाव आयटीआयला राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्यात आले आहे.
कुठल्या आयटीआयला कुठल्या महापुरुषाचे नाव?
- ठाणे - राजामाता जिजाऊ
- औंध - छत्रपती शिवाजी महाराज
- चंद्रपूर - राणी दुर्गावती
- पुणे - सावित्रीबाई फुले
- दादर - रमाबाई आंबेडकर
- जळगाव - राणी लक्ष्मीबाई
- मुंबई मांडवी - डॉ ए पी जे अब्दुल कलाम
- दादर - क्रांतीवीर बाबू गेनू
- मुलुंड - श्रीमद राजचंद्रजी
- धरणगाव, जळगाव- क्रांतिकारी खाज्याजी नाईक
- नांदेड - गुरु गोविंद सिंह
- सेलू, वर्धा - संत जगनाडे महाराज
- कळंब, धाराशिव - संतश्रेष्ठ गोरोबा काका
- रत्नागिरी - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
- शिरपूर, धुळे - किशनसिंह राजपूत
- कारंजा, वर्धा - चक्रवर्ती राजा भोज
- पेण, रायगड - हुतात्मा नाग्या कातकरी
- गडचिरोली - क्रांतिवीर बाबुराव शेडमाके
- अकोले, अहमदनगर - क्रांतिकारक राघोजी भांगरे
- किनवट, नांदेड - राजा शंकर शाह
- तळोदा, नंदुरबार - संत श्री गुलाम महाराज
- बसवेश्वर- महात्मा बसवेश्वर
- अलिबाग - सरखेल कान्होजी आंग्रे
- कळवण, नाशिक - ए टी पवार
- बारामती, पुणे - अनंतराव पवार
इतर महत्त्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI