(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Cabinet Decision: अवकाळी ते झोपु योजना, मुद्रांक शुल्क ते भाषा भवन, मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय
Maharashtra Cabinet Decision: राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या विकासासाठी मंत्रिमंडळाने 500 कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे.
Maharashtra Cabinet Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या ठिकाणी दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादा ठेवून मदत करण्याचाही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. एनडीआरएफच्या नियमानुसार ही मदत दिली जाणार आहे.
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील पीक पाण्याचा, अवकाळी पावसाने मोठया प्रमाणात नुकसान झालेल आहे. जवळपास राज्यात एक लाख हेक्टर वरती नुकसान झालं आहे. याचा आढावा घेतला गेला. अल्पसंख्यांक समाजाला इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असून त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाच्या विकासाचा मार्ग मोकळा होईल असं राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
राज्य मंत्रिमंडळ बैठक : संक्षिप्त निर्णय
* अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने सादर करणार. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देणार
( मदत व पुनर्वसन)
* झोपडपट्टी पुनर्वसनमधील सदनिका हस्तांतरण शुल्कात ५० टक्के कपात. झोपडीधारकांना मोठा दिलासा
( गृहनिर्माण विभाग )
* राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान. शाळांचे मूल्यांकन करणार. पहिल्या टप्प्यात ४७८ शाळा
( शालेय शिक्षण)
* मराठी भाषा भवनाची उभारणी वेगाने करणार
( मराठी भाषा विभाग)
* मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली
( अल्पसंख्याक विभाग )
* औद्योगिक व कामगार न्यायालयाच्या न्यायाधिशाना सुधारित सेवानिवृत्तीवेतन
( उद्योग विभाग )
* महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ राबवून महसुली उत्पन्नात मोठी वाढ करणार
( महसूल विभाग)
* शेती महामंडळाच्या खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग १ जमिनीसाठी अधिनियमात सुधारणा
( महसूल विभाग)