एक्स्प्लोर

Maharashtra Budget 2022 LIVE : 24 हजार 353 कोटी रुपयांच्या वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प

Maharashtra Budget Session 2022 LIVE Updates: अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार, कृषी क्षेत्रात 4.4 टक्के, उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के वाढीचा अंदाज, कोणत्या क्षेत्राला काय मिळणार?

LIVE

Key Events
Maharashtra Budget 2022 LIVE  : 24 हजार 353 कोटी रुपयांच्या वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प

Background

Maharashtra Budget Session 2022 LIVE Updates : आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचं बजेट म्हणजे, अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचं संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्यानं त्यांना ते कसा आणि काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्राची आघाडी, राज्याचा अर्थिक पाहणी अहवाल सादर

अर्थिक पाहणी अहवाल 2021-22 विधिमंडळाच्या पटलावर ठेवण्यात आला आहे. या अहवालानुसार, राज्याच्या आर्थिक वाढीचा दर 12.1 टक्के राहील, असा अदांज वर्तवण्यात आला आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 8.9 टक्के वाढ अपेक्षित आहे.

आर्थिक पाहणी अहवालातील माहितीनुसार, 2021-22 मध्ये राज्यातील उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के वाढ झाली आहे. तर सेवा क्षेत्रात 13.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच या अहवालात कृषि संलग्न कार्य क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नात 4.4 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. तर पीक क्षेत्राच्या वास्तविक स्थूल राज्य मूल्यवृद्धी 3.0 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे म्हटले आहे. 

अहवालातील पाहणी माहितीनुसार, राज्य सरकारने नोव्हेंबर 2021 पर्यंत 15 लाख 09 हजार 811 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह 21 हजार 216 औद्योगिक प्रकल्प मंजूर केले. तसेच नोव्हेंबर 2021 पर्यंत 74 हजार 368 कोटी रुपयांच्या 258 प्रकल्पांची नोंदणी, सप्टेंबर 2021 अखेर राज्यात 9 लाख 59 हजार 746 कोटी रुपयांची थेट विदेशी गुंतवणूक झाली असल्याचे या अहवालात सांगणायत आले आहे. 

दरम्यान, 3 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. 3 मार्च ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार आहे. तर, 11 मार्चला म्हणजेच, आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अशातच अधिवेशनात अनेक मुद्दे गाजले आहेत. अनेक मुद्द्यांवरुन विरोधकांनी सरकारला घेरलं आहे. अशातच आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून राज्याला काय मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

15:44 PM (IST)  •  11 Mar 2022

Maharashtra Budget 2022 LIVE : शिक्षणसंबंधित क्षेत्रासाठी अजित पवारांनी नेमक्या काय काय घोषणा केल्या...

  • उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद
  • शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद
  • मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी 
  • सांस्कृतिक विभागासाठी 193 कोटींच्या निधीची तरतूद
  • क्रीडा विभागासाठी 354 कोटींच्या निधीची तरतूद
15:43 PM (IST)  •  11 Mar 2022

Maharashtra Budget 2022 LIVE : पर्यटन क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात काय तरतूद?

  • कोयना,जायकवाडी व गोसीखुर्द येथे जल पर्यटन प्रकल्प प्रस्तावित 
  • जव्हार जि.पालघर, फर्दापूर जि.औरंगाबाद, अजिंठा,वेरूळ,महाबळेश्वर व लोणावळा येथे पर्यटन विकासाकरीता सुव‍िधा निर्माण करण्यासाठी अनुदान
  • पुरातत्व स्मारकांच्या जतन, संवर्धन आणि दुरुस्तीसाठी जिल्हानिहाय “महावारसा सोसायटीची स्थापना
  • बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात "आफ्रिकन सफारी" सुरु करणार
  • पुणे वन विभागात  बिबट्या सफारी सुरु करणार
15:42 PM (IST)  •  11 Mar 2022

Maharashtra Budget 2022 LIVE : अर्थसंकल्पामध्ये उद्योग क्षेत्रासाठी काय तरतूद?

  • मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 अंतर्गत  98 गुंतवणूक करारातून      189000 हजार कोटी रूपये  गुंतवणूक आणि रोजगाराच्या 3 लाख 30 हजार नवीन  संधी 
  • ई-वाहन धोरणांतर्गत सन 2025 पर्यंत वाहन नोंदणीत इलेक्ट्रीक वाहनांचा हिस्सा १० टक्के व मोठ्या शहरांच्या सार्वजनिक वाहतुकीतील हिस्सा 25 टक्के करण्याचे उद्द‍ीष्ट. 5000 चार्जिंग सुविधा उभारणार
  • मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत 30,000 अधिक स्वयंरोजगार प्रकल्पातून सुमारे 1 लाख रोजगार संधी 
  • कोविडमुळे विधवा झालेल्या महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी 100 टक्के व्याज परताव्याची पंड‍िता रमाबाई स्मृती शताब्दी महिला उद्योजक ही नवीन योजना
  • मौजे कौडगाव व मौजे शिंदाळा (जि.लातूर), मौजे साक्री (जि.धुळे), वाशीम, मौजे कचराळा (जि.चंद्रपूर) आणि यवतमाळ  येथे एकूण 577 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प, राज्यात 2500 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा पार्क
  • मुंबईत पारेषण प्रणालीच्या क्षमतेत वाढ करण्यासाठी 11530 कोटी रुपयाचे 5 प्रकल्प
15:40 PM (IST)  •  11 Mar 2022

Maharashtra Budget 2022 LIVE : अजितदादांच्या सुटकेसमधून शिक्षणक्षेत्रासाठी मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2022 LIVE : महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा 2022-23  या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. गेल्या काही काळापासून कोरोनामुळं शिक्षणक्षेत्रावर मोठे निर्बंध आले आहेत. शिक्षणक्षेत्राला बळकटी मिळावी यासाठी अजित पवारांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे तर शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा केली आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

15:38 PM (IST)  •  11 Mar 2022

Maharashtra Budget 2022 LIVE : अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा

> हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे.

> शेतकरी कल्याणासाठी अधिक अनुदान देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

> नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे.

> दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. त्याशिवाय गोसीखुर्द प्रकल्पासाठीच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली.

> कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली. 

> पंतप्रधान सिंचन योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. 

> जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांच्या निधीची तरतदू यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. 

> भरड धान्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.  

> शेततळ्यासाठी अनुदानात वाढ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. आता 75 हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.  

> देशी गाई, बैलांची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात तीन मोबाइल प्रयोगशाळा उभारणार

> प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी प्रकल्प

> या वर्षात 60 हजार कृषीपंपाना वीज देणार

> एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्यं

> मुंबईतील पशूवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSalman Khan Threat Message :  बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकीABP Majha Headlines :  8 AM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?
Sada Sarvankar: सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
सदा सरवणकरांची प्रचारफेरी 'शिवसेना भवन'समोर येताच काय घडलं? श्रीकांत शिंदेही सहभागी!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
तब्बल 1 कोटी 11 लाखांचे सोन्याचे चेंडू घेऊन फिरत होता, पोलिसांनी हटकलं अन् धक्कादायक प्रकार आला समोर!
Devendra Fadnavis: काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
काँग्रेसचा केंद्रातील बडा वलयांकित नेता देवेंद्र फडणवीसांविरोधात मैदानात उतरला, म्हणाला...
Rohit Pawar: मोठ्या नेत्यांवर भुंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस छोटे नेते पदरी बाळगतात, त्यांना बिस्किटं म्हणून पदं देतात: रोहित पवार
मविआ विधानसभा निवडणुकीत नेमक्या किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी सांगितला आकडा
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Singham Again Box Office Collection Day 7: आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
आठवडा उलटूनही 200 कोटींचा टप्पा ओलांडू शकला नाही 'सिंघम अगेन'; भांडवलं तरी वसूल होणार?
Embed widget