(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Budget : अजितदादांच्या सुटकेसमधून शिक्षणक्षेत्रासाठी मोठ्या घोषणा; कोट्यवधीच्या निधीची तरतूद
Maharashtra Budget 2022 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) यांनी आज अर्थसंकल्पात शिक्षणक्षेत्रासाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.
Maharashtra Budget 2022 : महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्याचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. गेल्या काही काळापासून कोरोनामुळं शिक्षणक्षेत्रावर मोठे निर्बंध आले आहेत. शिक्षणक्षेत्राला बळकटी मिळावी यासाठी अजित पवारांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे तर शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा केली आहे.
शिक्षणसंबंधित क्षेत्रासाठी अजित पवारांनी नेमक्या काय काय घोषणा केल्या...
उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद
शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद
मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी
सांस्कृतिक विभागासाठी 193 कोटींच्या निधीची तरतूद
क्रीडा विभागासाठी 354 कोटींच्या निधीची तरतूद
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापुरूषांशी संबंधित गावांतील 10 शाळांकरिता 10 कोटी रुपये निधी
अजित पवारांनी केलेल्या महत्वाच्या घोषणा
शेततळ्यांना आता 75 हजारांचे अनुदान देणार
मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी
60 हजार कृषी पंपांना वीज जोडणी देणार
गोसीखुर्द प्रकल्पासाठी 850 कोटी रूपये उपलब्ध करून देणार
महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्केची तरतूद आता वाढवून 50 टक्के केलेली आहे.
कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर देणार
कोरोनामुळे पंचसूत्री अर्थसंकल्पावर भर देणार
बाळासाहेब पाटील कृषी संशोधन केंद्र स्थापन करणार
हळद संशोधन 100 कोटी
विदर्भ आणि मराठवाडा सोयाबीन केंद्र, 3 वर्षात 1 हजार कोटी खर्च करणार
मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया योजना राबवण्यात येणार आहे
कोकण कृषी आणि वसंतराव नाईक विद्यापीठांना 50 वर्ष पूर्ण होणार असल्याने 50 कोटींचा निधी
कृषी निर्यात धोरण करणारे महाराष्ट्र पहिले राज्य
हवेलीत संभाजीराजेंचं स्मारक उभारणार
संबंधित बातम्या