एक्स्प्लोर

जिल्हा परिषदेच्या 1183 महिला कर्मचाऱ्यांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; कारवाई होणार, सीईओंचे आदेश

एका घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र, दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेल्या लाडक्या बहि‍णींची यादी सरकारने तयार केल्याचं समोर आलं होतं

हिंगोली : राज्यातील लाडकी बहीण योजनेवरुन सातत्याने गदारोळ होताना पाहायला मिळतो. कारण, लाडकी बहीण योजनेतील (Ladki bahin yojana) लाभार्थी महिलांची स्क्रुटीनी होत असून दररोज नव्याने बोगस लाभ घेणारे लाभार्थी समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी राज्यातील तब्बल 26 लाख लाभार्थी महिलांची (Women) गृह चौकशी होणार असल्याचे वृत्त झळकले. त्यानंतर, विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती, निवडणुकांपूर्वी सरसकट महिलांना लाभ देणारे सरकार आता महिलांची गळती करत असल्याचे विरोधकांनी म्हटले. त्यातच, आता आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून राज्यात 1183 जिल्हा परिषद (ZP) कर्मचारी असलेल्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलं आहे. 

एका घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र, दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेल्या लाडक्या बहि‍णींची यादी सरकारने तयार केल्याचं समोर आलं होतं. त्यानुसार, तब्बल 26 लाख महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाने तयार केली आहे, या सर्व महिलांची विभागानुसार चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या 1 हजारपेक्षा जास्त महिलांनी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची बाब उघडकीस आली आहे. 

महिला कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेत जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याची माहिती पुढे आली आहे. राज्यभरातील 1183 कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती महिला व बालविकास विभागाने सरकारला दिली. आता शासनाच्या कक्ष अधिकारी यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना या बोगस लाडक्या बहिणींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत कार्यवाही करण्यासाठी सर्व जिल्हा परिषदेच्या सीईओंना आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे, बोगस माहिती देत लाडकी बहीण योजनेचे दरमहा 1500 रुपये घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील महिला कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची टांगती तलवार आहे. 

लाखो महिलांना वगळणार

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यात सध्या 2 कोटी 29 लाख महिलांना लाभ मिळत आहे.  मात्र, एकाच कुटुंबातील केवळ 2 महिलांची छाननीचा निकष पूर्ण झाल्यानंतर आणखी लाखो महिला लाडकी बहीण योजनेतून वगळल्या जाणार आहेत. तर, जिल्हा परिषद कर्मचारी महिलांनाही आता योजनेतून वगळण्यात येईल. दरम्यान, योजनेच्या नियमानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रतिमहिना दिले जातात. तर, ज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेता लाभ घेतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये दिले जातात. 

हेही वाचा

अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी वर्षा मीना, परभणीतही कलेक्टर बदलले; राज्यात पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले

व्हिडीओ

Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट
Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंवर गंभीर आरोप
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Embed widget