Latur : लातुरात साकारतोय भारतातील पहिला अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रेनफोर्सड कॉंक्रीट पूल
लातूर येथे पुलासाठी लागणारे सर्व साहित्य हे मलेशिया येथून आणण्यात आले. यापुढे देशात ही असे पूल तयार करण्यात येणार आहेत.
![Latur : लातुरात साकारतोय भारतातील पहिला अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रेनफोर्सड कॉंक्रीट पूल India first ultra high performance fiber reinforced concrete bridge being built in Latur Latur : लातुरात साकारतोय भारतातील पहिला अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रेनफोर्सड कॉंक्रीट पूल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/28/762b6f6996baac2ae942c2458e34d23b_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लातूर : लातूर निलंगा तालुक्यातील एक पूल सध्या चर्चेचा विषय ठरतोय. कारण अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रेनफोर्सड काँक्रिट या तंत्रज्ञानाचा वापर करत हा पूल उभारण्यात आलाय. या तंत्रज्ञानाने बांधलेला हा भारतातील पहिलाच पूल आहे. काल त्याची पाहणी आणि लोकार्पण केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली.
पारंपारिक पूल बांधताना 30 मीटर अंतरावर पिलर बांधले जातात या तंत्रज्ञानात 120 मीटर अंतरावर पिलर टाकले आहेत. एम 40 या पारंपरिक पद्धतीपेक्षा हा 4 पट मजबूत आहे. नेहमीच्या पुलापेक्षा 30 ते 35 टक्के एवढा हा वजनाने हलका आहे. हा पूल बघितल्यानंतर देशभर आपण असेच पूल बांधणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. या पुलासाठी लागणारे सर्व साहित्य हे मलेशिया येथून आणण्यात आले. यापुढे देशात ही असे पूल तयार करण्यात येणार आहेत.
पुलाचे वैशिष्ट्य
- अल्ट्रा हायपरफॉर्मन्स फायबर रेनफोर्सड काँक्रिट या तंत्रज्ञानानुसार बांधलेला भारतातील पहिला पूल आहे.
- 55 .50 मीटर लांबीचे दोन स्पेन बांधून हा पूल तयार करण्यात आलेला आहे
- या पुलाच्या गार्डमध्ये लोखंडी सळ्यांचा वापर करण्यात आलेला नसून स्टील फायबर वापरण्यात आलेले आहे.
- गर्डर पोस्ट टेन्शन इन पद्धतीने कॉम्प्रेस केली जातात
- सदर पुलांमध्ये एम 155 ग्रेडचे काँक्रीट वापरण्यात आलेले आहे. जे पारंपारिक पुलांपेक्षा चार पट अधिक क्षमतेचे आहे
- या पुलांमध्ये पारंपारिक पुलापेक्षा 30 ते 35 टक्के कमी वजनाचे यू एचपी एम आर जी तंत्रज्ञानाच्या गर्डर असल्यामुळे अति हलक्या वजनामुळे पुलाच्या कामांमध्ये सुलभ हाताळणी होते. पुलाचे काम जलद गतीने करता येते कामाच्या वेळेची बचत होते.
- गंजरोधक व कार्बन प्रतिरोधकतेच्या बाबतीत हा पुल अधिक जास्त टिकाऊ आहे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)