एक्स्प्लोर

Hijab Controversy :  हिजाब प्रकरणाचे राज्यात पडसाद! पुण्यात राष्ट्रवादीचं भाजपविरोधात आंदोलन तर हिंदू महासभेची रॅली, गृहमंत्री म्हणाले...

हिजाबचा हा मुद्दा कर्नाटकात जानेवारीमध्ये सुरू झाला होता. जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये 6 मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले होते.

Hijab Controversy :  कर्नाटक (karanataka Hijab controversy) राज्यात हिजाबवरून सुरू असलेल्या वादाचे पडसाद आता राज्यातही उमटताना दिसत आहेत. अशातच याचा विरोध म्हणून एकीकडे नाशिकच्या (Nashik) मालेगावमध्ये (Malegaon) मुस्लिम समाजाकडून (Muslim Community) हिजाब दिन पाळण्यात येणार आहे. तर आज पुण्यात राष्ट्रवादीकडून (Ncp) भाजपविरोधात (Bjp) आंदोलन करण्यात आलं तर हिंदू महासभेतर्फे भगवे वस्त्र परिधान करून रॅली काढण्यात आली. या सर्व प्रकरणावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली. 

महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडवणे योग्य नाही - गृहमंत्री
हिजाबचा मुद्दा आपल्याच राज्यात झालेला नाही, त्यामुळे इतर कोणत्याही राज्यातील प्रश्नांबाबत महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था बिघडवणे योग्य नाही. त्यावर लक्ष ठेवावे आणि कोणत्याही प्रकारे शांतता भंग करू नये, असे आम्ही पोलिसांना कळवले असून, आतापर्यंत महाराष्ट्रात 40 हून अधिक ठिकाणी हिजाबबाबत आंदोलने केली आहेत.

पुण्यात हिजाब प्रकरणावरून निषेध आंदोलन
कर्नाटकमध्ये मुस्लिम समुदायाच्या मुलींना हिजाब वापरण्यास बंदी घालनाऱ्या कर्नाटक भाजप सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महात्मा फुले वाड्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी काही महिला भगिनी देशातील विविध महिला परंपरांच्या वेशभूषेत पाहायला मिळाल्या. तर हिंदू महासभेच्या महिलांनी भगवे वस्त्र घालून कसबा गणपती ते लाल महाल या परिसरात ही रॅली काढण्यात आली. राज्यात हिजाब आणि बुरखाधारी महिलांचे समर्थन करण्यात येत आहे. तर काही ठिकाणी  हिंदू धर्मीयांकडून भगवे वस्त्र परिधान करून रॅली काढण्यात आली. नाशिकच्या मालेगाव शहरात शुक्रवारी हिजाब दिवस पाळला जाणार आहे.  मंगळवारी 'जमियत उलेमा ए हिंद'च्या प्रमुख मौलांनाची बैठक आमदार मौलाना मुफ्ती ईस्माईल यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी महिला मेळावा घेण्यात येऊन तेथे हिजाब आणि बुरखाधरी महिला येणार असून हिजाबचे समर्थन करण्यात येणार आहे. 

हिजाबचा मुद्दा जानेवारीपासून चर्चेत

हिजाबचा हा मुद्दा कर्नाटकात जानेवारीमध्ये सुरू झाला होता. जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये 6 मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले होते. महाविद्यालयाने गणवेश धोरणाचे कारण सांगितले, त्यानंतर विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि असा युक्तिवाद केला की त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम 14 आणि 25 अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.

 ...तर आमची मुले पण भगवे घालून कॉलेजला जातील 

हिंदू महासंघातर्फे भगवे उपरणे घालून पुण्यात कसबा गणपती समोरुन मिरणवूक काढण्यात आली, दरम्यान हिजाब ला जर सुशिक्षित महिला समर्थन करीत असतील तर हिंदू जास्त सुशिक्षित महिला पण हिंदुत्व साठी भगव्या साठी आक्रमक होण्यासाठी तयार आहेत. आमची मुले पण भगवे घालून कॉलेज ला जातील  मुस्लिम महिलांकडून जर हिजाब चे समर्थन होत असेल आम्ही देखील भगवे उपरणे घालून मुलांना शाळेत पाठवू असे आंदोलनकर्त्यांकडून सांगण्यात आले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget