(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Malala on Hijab Controversy : कर्नाटक हिजाब प्रकरणावर मलालाची प्रतिक्रिया; म्हणाली 'मुलींना शाळेत जाण्यापासून रोखणे...'
Malala on Hijab Controversy : मलालाने यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, कमी किंवा अधिक कपडे घालण्यावरुन महिलेच चारित्र्य ठरवलं जाते. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांना दुर्लक्षित करणे थांबवावे.
Malala on Hijab Controversy : भारतात सध्या कर्नाटकातील हिजाब प्रकरण चर्चेत आहे. पाकिस्तानी सामाजिक कार्यकर्त्या आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने कर्नाटकातील हिजाब वादावर प्रतिक्रिया दिली आहे. मलालाने म्हटले आहे की, ''मुलींना शाळेत जाण्यापासून रोखणे हे भयावह आहे.'' हिजाबच्या वादाने आता हिंसक वळण घेतले आहे. मंगळवारी संपूर्ण कर्नाटकात हिंसाचाराशी संबंधित अनेक धक्कादायक घटना पाहायला मिळाल्या.
मलाला युसुफझाईने ट्विट केले की, ''हिजाब परिधान केलेल्या मुलींना शाळेत प्रवेश करण्यापासून रोखणे हे भयावह आहे. कमी किंवा अधिक कपडे घालण्यावरुन महिलेच चारित्र्य ठरवलं जाते. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांना दुर्लक्षित करणे थांबवावे.''
“College is forcing us to choose between studies and the hijab”.
— Malala (@Malala) February 8, 2022
Refusing to let girls go to school in their hijabs is horrifying. Objectification of women persists — for wearing less or more. Indian leaders must stop the marginalisation of Muslim women. https://t.co/UGfuLWAR8I
हिजाबचा मुद्दा जानेवारीपासून चर्चेत
हिजाबचा हा मुद्दा कर्नाटकात जानेवारीमध्ये सुरू झाला होता. जानेवारीमध्ये उडुपी येथील सरकारी पीयू कॉलेजमध्ये 6 मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालून वर्गात बसण्यापासून रोखण्यात आले होते. महाविद्यालयाने गणवेश धोरणाचे कारण सांगितले, त्यानंतर विद्यार्थिनींनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि असा युक्तिवाद केला की त्यांना हिजाब घालण्याची परवानगी न देणे हे घटनेच्या कलम 14 आणि 25 अंतर्गत मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे.
कर्नाटकात तीन दिवस शाळा, महाविद्यालये बंद
कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालये 12 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्नाटकात महाविद्यालये आणि शाळांबाहेर हिजाब समर्थक आणि हिजाब विरोधक गटांकडून निदर्शने करण्यात येत आहे. हिजाब समर्थक ग्रुप हिजाब घातल्याने मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश नाकारल्याबद्दल आणि त्यांच्यावर लावण्यात आलेल्या बंधनांचा विरोध करत आहे. तर दुसरीकडे अनेक हिंदुत्ववादी संघटानांनी हिजाबचा विरोध करत हिंदू विद्यार्थ्यांना देखील भगव्या रंगाची शाल आणि टोपी वाटत आहे.
संबंधित बातम्या :
- Wardha HinganGhat Case : हिंगणघाट जळीतकांड, मारेकऱ्याला फाशी? आज न्यायालय फैसला सुनावणार
- ठाकरे सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर...; उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात संजय राऊतांचा ईडीवर खळबळजनक आरोप
- Covid19 : सावधान! सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळले कोरोनाचे चार 'गुप्त' प्रकार, धोका वाढण्याची शक्यता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha