(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'धनुष्यबाण' चिन्ह आणि 'शिवसेना' नाव कधीपर्यंत गोठवलं?; निवडणूक आयोगाच्या निर्णयातील महत्वाचे 10 मुद्दे
Shiv Sena Symbol : उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईत दोन्ही गटाला निवडणूक आयोगानं दणका दिला.
Shiv Sena Symbol : निवडणूक आयोगाच्या 1968 मधील पक्ष चिन्हाच्या ऑर्डरनुसार आज निर्णय घेण्यात आला आहे. निवडणूक अधिकारी अनुप चंद्र पांडे आणि मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी आज शिवसेनामधील पक्ष आणि चिन्हाच्या वादावर मोठा निर्णय घेतला. उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईत दोन्ही गटाला निवडणूक आयोगानं दणका दिला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णायाचा उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. कारण, अंधेरी येथील पोटनिवडणुकीत शिंदे गट सहभाग नोंदवणार नाही.
निवडणूक आयोगाच्या निर्णयातील महत्वाचे 10 मुद्दे...
निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं.
एकनाथ शिंदे गटाला आणि उद्धव ठाकरे गटाला शिवसेना नावही वापरता येणार नाही.
फक्त शिवसेना हे नाव दोन्ही गटांना घेता येणार नाही. पण, शिवसेनेशी संबंधित काहीही नाव घेता येईल.
सोमवारपर्यंत नव्या चिन्हाची निवड करण्याची मुदत निवडणूक आयोगानं दोन्ही गटाला दिली आहे.
निवडणूक आयोगानं घेतलेला आजचा निर्णय हा अंधेरी येथील पोटनिवडणूक आणि त्यापुढेही निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत कायम राहणार आहे.
एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यापैकी एकाने माघार घेतल्यास दुसऱ्या गटाला शिवसेना नाव देण्यात येईल. कोणत्याही गटाने माघार घेतली नाही तर "शिवसेना"साठी राखीव असलेले "धनुष्यबाण" हे चिन्ह दोन्ही गटांपैकी कोणत्याही गटाला वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.
दोन्ही गटांना नव्या चिन्हाची निवड करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दोन्ही गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी तीन तीन पर्याय दिले जाणार आहेत, असं देखील निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
दोन्ही गटांना अंधेरी येथील पोटनिवडणुकीत निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून चिन्ह वापरावं लागेल.
तथ्य आणि परिस्थिती लक्षात घेता चिन्ह आणि पक्षाबाबत निर्णय घेण्यासाठी उपलब्ध वेळ पुरेसा नाही. पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकामुळे निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं आहे तसेच पक्षाचं नाव वापरण्यावर निर्बंध घातले आहेत.
दोन्ही गटाकडून बैठकीचं आयोजन -
निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर दोन्ही गटाकडून बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्णायानंतर उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बैठक बोलवली होती. त्याशिवाय उद्या दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर पुन्हा बैठक होणार आहे. तर रविवारी वर्षा बंगल्यावर शिंदे गटाची संध्याकाळी सात वाजता बैठक होणार आहे. बैठकीला सर्व महत्वाचे नेते हजर राहणार आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :
Shiv Sena Symbol: 'धनुष्यबाण' कुणालाच नाही! शिवसेना नावही वापरायचं नाही; आता ठाकरे अन् शिंदेंसमोर पर्याय काय?
Shiv Sena Symbol: 'धनुष्यबाण' कुणालाच नाही! शिवसेना नावही वापरायचं नाही; आता ठाकरे अन् शिंदेंसमोर पर्याय काय?