Local Train Fight: विरारनंतर आता डोंबिवली लोकलमध्ये महिलांनी एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, ढकलाढकली, तुंबळ हाणामारी, व्हिडीओ व्हायरल
व्हिडिओमध्ये अनेक महिला एकमेकींना ढकलत असल्याचे दिसते. या व्हिडीओत दोन महिला केस उपटत एकमेकींना बेदम मारत असल्याचे दिसत आहे.

Mumbai: लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांमध्ये पुन्हा एकदा तुफान राडा झाल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वी विरार लोकलमध्ये एका महिलेला रक्त येईपर्यंत मारहाण झाल्याचा प्रकार ताजा असतानाच, आता डोंबिवली स्थानकावरून आज (1 जुलै) सकाळी 8.20 वाजता सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची जोरदार हाणामारी झाली. ही घटना स्थानिक महिला डब्यात घडली असून, एकमेकींवर ओरडत, शिवीगाळ करत आणि झिंज्या उपटत मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये अनेक महिला एकमेकींना ढकलत असल्याचे दिसते. या व्हिडीओत दोन महिला केस उपटत एकमेकींना बेदम मारत असल्याचे दिसत आहे. (Dombivli Local Women Fight)
डोंबिवली लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी
विरार लोकलमध्ये एका महिलेला रक्त पडेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा डोंबिवलीमध्ये सकाळी 8.20 वाजता डोंबिवलीवरून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी पाहायला मिळाली एकमेकींच्या झिंजा उपटत मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दररोजच्या प्रमाणे गर्दीच्या वेळेत महिलांचा लोकल डबा भरलेला असतो. याच गर्दीत जागेवरून वाद झाला असावा, असं प्राथमिक माहितीवरून समजते. पण हा वाद इतका वाढला की थेट हाणामारीपर्यंत गेला. काही महिला प्रवाशांनी त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला, मात्र या महिलांनी कुणाचंच ऐकलं नाही.मुंबई लोकलमध्ये महिला डब्यात होणाऱ्या अशा भांडणाच्या घटना आता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. यामुळे इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो, तसेच सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. रेल्वे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
जागेच्या वादावरुन मारहाण
ही घटना विरार लोकलमधील मिरारोड ते भाईंदर स्थानकांदरम्यान 17 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता घडली. प्राथमिक माहितीनुसार, जागेच्या वादातून दोघींमध्ये वाद सुरू झाला आणि त्याचे पर्यवसन मारहाणीमध्ये झाले. प्रवाशांनी घटनेचा व्हिडीओ मोबाईलमध्ये चित्रीत केला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकाराची दखल घेतली जात आहे. सायंकाळी 7.32 वाजता ही लोकल भाईंदर स्थानकात दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत दोन्ही महिलांना गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर त्यांच्या चौकशीदरम्यान जागेच्या वादातूनच हा प्रकार घडल्याचे निष्पन्न झाले.
हेही वाचा























