कांदा उत्पादकांसाठी 'केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, पियुष गोयल यांचं फडणवीसांना आश्वासन
कांदा प्रश्नावर सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. मंत्री पीयुष गोयल यांच्यासोबत होणार बैठक होणार आहे.
मुंबई: कांद्याच्या (Onion) प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांची भेट घेतली. केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेईल, पियुष गोयल यांनी फडणवीसांना आश्वासन दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्टिटवरुन माहिती दिली आहे.
कांदा निर्यातबंदीनंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचं गोयल यांना भेटून निवेदन दिलं. सह्याद्री अतिथीगृहावर पियुष गोयल आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीसांनी स्वत: ही माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकरी बांधवांचे महत्त्वाचे प्रश्न कांदा, कापूस व सोयाबीन या विषयांवर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्यासह एक सकारात्मक बैठक सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे झाली. पियुष गोयल यांनी शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन या बैठकीत दिले.
कांदा प्रश्नावर सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक
कांदा प्रश्नावर सोमवारी दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. मंत्री पीयुष गोयल यांच्यासोबत होणार बैठक होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याच्यासह नाशिकमधील व्यापारी राहणार बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्राने कांदा निर्यात बंदी केल्याने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद आहेत. मंत्री पियुष गोयल, नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांची माहिती आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
🕘 8.50pm | 09-12-2023 📍Sahyadri Guest House, Mumbai | संध्या. ८.५०वा. | ०९-१२-२०२३ 📍 सह्याद्री अतिथीगृह, मुंबई
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 9, 2023
शेतकरी बांधवांचे महत्त्वाचे प्रश्न कांदा, कापूस व सोयाबीन या विषयांवर मा. केंद्रीय मंत्री पियूष गोयल जी यांच्या सह एक सकारात्मक बैठक, आज सायंकाळी सह्याद्री अतिथी… pic.twitter.com/TyZEi7QcUu
मागील आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने शेती उत्पादनाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी चांगलाच झोडपलेला असतांना त्यातून शेतकरी कसाबसा उभा राहू पाहत होता मात्र पुन्हा एकदा केंद्र सरकारने ' निर्यातबंदी ' ची कुऱ्हाड शेतकऱ्यावर चालवल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. आशिया खंडातील जागतिक बाजारपेठ म्हणून उल्लेख असलेली कांद्याची बाजारपेठ लासलगाव ही देखील नाशिक जिल्ह्यातच आहे.मात्र ज्यांच्यामुळे हा नावलौकिक मिळाला आहे तो जगाचा पोशिंदा मात्र सध्या हवालदील झाला आहे. त्याला कारणही तसेच आहे..मागील आठवड्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले..शेतातील काढणीला आलेला कांदा व शेतात काढून ठेवलेला कांदा हा गारपिटीमुळे पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.