एक्स्प्लोर

Rohit Pawar : देवेंद्र फडणवीसांच्या ओएसडींचा परदेश दौऱ्याचा खर्च कुणी केला? त्यांची कुठे गुंतवणूक आहे? रोहित पवारांच्या आरोपांवर कौस्तुभ धवसे यांचे स्पष्टीकरण

Rohit Pawar Allegation On Devendra Fadanvis OSD : रोहित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी असे आरोप करण्यापूर्वी थोडा अभ्यास केला असता, तर अधिक बरे झाले असते. त्यामुळे ‘हार्वर्ड स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स’सारखे हास्यास्पद विनोद किमान टाळता आले असते असं कौस्तुभ धवसे यांनी म्हटलंय.  

मुंबई: राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी कौस्तुभ धवसे (Devendra Fadanvis OSD Kaustubh Dhavse) यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यांच्या परदेश दौऱ्यावर 1 कोटी 88 लाखांचा खर्च झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तसेच जपानला देवेंद्र फडणवीस गेले, तिथं खर्च एमआयडीसीने केला होता. तिथं त्यांचे ओएसडी कौस्तुभ धवसे (Kaustubh Dhavse) कशासाठी गेले होते, कौस्तुभ धवसे हे त्यांच्याशी संबंधित नसलेल्या परदेश दौऱ्यावर जातात आणि सर्वसामान्यांच्या कराचे पैसे खर्च करतात असा आरोप आमदार रोहित पवारांनी केला होता. त्यावर आता कौस्तुभ धवसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

कौस्तुभ धवसे यांचे स्पष्टीकरण काय?

आरोप 1 : तायवान दौर्‍यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे हे तेथे का गेले? 3 दिवसांत या दौर्‍यावर 1.88 कोटी खर्च कसा काय झाला?

उत्तर : तायवानचा दौरा हा अतिशय महत्त्वाचा होता. या दौर्‍याचे उद्योग विभागाने याचे संपूर्ण नियोजन केले होते. प्रारंभिक पातळीवर हा राजकीय दौरा ठरला होता. तथापि केंद्र सरकारने सर्वच राज्यांना सध्या तायवान दौरे हे राजकीय नेत्यांऐवजी अधिकारी पातळीवर करावेत, असे निर्देश दिले होते. काही राज्यांनी तर त्या देशांनी उद्योग संपर्कासाठी कार्यालये सुद्धा उघडली आहेत. त्यामुळे हा दौरा अधिकार्‍यांनीच करावा, असेही ठरले आणि तसे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिले. 

या दौर्‍यात कोणत्या श्रेणीतील अधिकार्‍याचे कोणत्या श्रेणीचे तिकिट काढावे, तसेच भत्ते किती द्यावे, यासंबंधी शासनाचा स्वयंस्पष्ट जीआर आहे. त्यानुसारच, तिकिटं काढण्यात येतात. समजा एखाद्या अधिकार्‍याला आपले तिकिट अपग्रेड करायचे असेल तर त्याचा अतिरिक्त खर्च हा संबंधित अधिकारी करीत असतो. मात्र, संबंधित ट्रॅव्हल्स कंपनी संपूर्ण बिल विभागाला सादर करते. त्यानंतर संबंधित फरकाच्या रकमेची क्रेडिट नोट जारी करते आणि तितका पैसा संबंधित अधिकारी थेट एजन्सीला देत असतो. त्यामुळे हा संपूर्ण खर्च विभागाने केला, असे म्हणण्यात अर्थ नाही.

आरोप 2 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौर्‍याचा खर्च जपानने केलेला नाही, तर तो एमआयडीसीने केला

उत्तर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जपान दौर्‍यात शासकीय अतिथी म्हणून गेले होते. त्यांचा खर्च हा जपानच्या सरकारने केला होता. याची माहिती सविस्तरपणे माहिती अधिकारात सुद्धा आलेली आहे. त्यांच्यासोबत गेलेल्या शासकीय अधिकार्‍यांचा खर्च मात्र, एमआयडीसीने केलेला आहे. कारण, हा विविध कंपन्यांसोबत भेटण्यासाठीचा दौरा होता. हा केवळ पीएचडीचा दौरा नव्हता.

आरोप 3 : यूएसटी ग्लोबल ही कंपनी कुणाची? त्यात कुणी ओएसडी आहे का?

उत्तर : यूएसटी ग्लोबल कंपनीसंदर्भात केलेले आरोप सुद्धा पूर्णपणे बिनबुडाचे आहेत. माझे आणि या कंपनीचे दुरान्वयाने सुद्धा संबंध नाहीत. माझे शिक्षण हे हार्वड स्कुल ऑफ गर्व्हनमेंट येथे झालेले आहे, तर आरोपात नमूद केल्याप्रमाणे ‘हार्वर्ड स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स’ अशी संस्था अस्तित्त्वातच नाही. युएसटी ग्लोबलच्या कुठल्याही अधिकार्‍यांचे माझ्यासोबत एकत्र शिक्षण झालेले नाही. त्यामुळे हे संपूर्ण आरोप निराधार, बिनबुडाचे आहेत. रोहित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी असे आरोप करण्यापूर्वी थोडा अभ्यास केला असता, तर अधिक बरे झाले असते. त्यामुळे ‘हार्वर्ड स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स’सारखे हास्यास्पद विनोद किमान टाळता आले असते.

आरोप 4 : एखादा व्यावसायिक उपमुख्यमंत्र्यांचा ओएसडी कसा असू शकतो? त्यांची खाजगी कंपनीत गुंतवणूक आहे

उत्तर : माझा कुठलाही व्यवसाय नाही. माझी कोणत्याही खाजगी कंपनीत गुंतवणूक नाही. 2014 ते 2019 आणि 2022 ते आजपर्यंत या संपूर्ण काळात मी कुठल्याही व्यावसायिक प्रतिष्ठानाशी, कंपनीशी संबंधित नव्हतो आणि नाही. माझ्या आयकर विवरणातून याची सहजपणे घेता आली असती. शिवाय, 2020 आणि 2021 या काळात मी विदेशात रहायला गेलो होतो, असेही त्यांनी सांगितले. याही आरोपात कुठलेच तथ्य नाही. मी या दोन्ही वर्षांत मी मुंबईत वास्तव्याला होतो आणि नियमितपणे विरोधी पक्षनेता कार्यालयात माझे नियमित काम सुद्धा करीत होतो.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget