एक्स्प्लोर

Rajan Patil : पाटलांच्या पोरांना लग्नाआधीच पोरं होतात याचा अभिमान, राष्ट्रवादीच्या माजी आमदाराचं वक्तव्य, गुन्ह्याचंही समर्थन

खासदार धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची जीभ घसरली आहे. पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी पोरं असल्याचे वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.

Rajan Patil : सध्या भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Bhima Co-operative Sugar Factory Election) लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि मोहळचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) विरुद्ध भाजपचे खासदार धनंजय महाडीक (Dhananjay Mahadik) असा सामना होत आहे. या निवडणुकीच्या प्रचारात धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना राजन पाटील यांची जीभ घसरली आहे. पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी बाळं असल्याचे वक्तव्य राजन पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, राजन पाटलांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे दुसरे नेते उमेश पाटील यांनी टीका केली आहे.

 नेमकं काय म्हणालेत राजन पाटील

भीमा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांनी सत्ताधारी धनंजय महाडिक यांच्यावर टीका करताना अत्यंत खालच्या पातळीत वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. खासदार महाडिक यांनी प्रचार करताना राजन पाटील यांच्या मुलांना, 'बाळांनो असे बोलू नका' असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना राजन पाटील यांची जीभ घसरली. 'आमच्या पोरांना बाळ म्हणतोय, अरे आम्ही पाटील आहोत, पाटलांच्या पोरांना लग्नाच्या आधीच तुझ्याएवढी एवढी बाळं असतात असे सांगत त्याचा आम्हाला स्वाभिमान असल्याचे राजन पाटील म्हणाले. तसेच आमच्या पोरांना वयाच्या 17 व्या वर्षीच 302, 307 ची कलमं लागली आहेत, याचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हणत राजन पाटील यांनी एक प्रकारे मुलांच्या गुन्हेगारीचं समर्थन केलं आहे.

 

टाकळी सिकंदर येथील प्रचाराच्या अंतिम सभेत बोलताना राजन पाटील यांनी महाडिकांवर टीका केली. लग्नाआधी आमच्या पोरांना तुझ्या एवढी पोर झाल्याचं सांगत, त्याचा अभिमान असल्याचेही पाटील म्हणाले. त्यामुळं आता राष्ट्रवादी आपल्या या नेत्यावर काय कारवाई करणार? याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, राजन पाटील यांच्या या वक्तव्याच्या तीव्र प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. 

उमेश पाटलांची राजन पाटलांवर टीका

राजन पाटलांचं वक्तव्य हे महिलांचं अपमान करणारं आहे. स्वत:च्या पोरांना लग्नाअधीच पोरं झाली आहेत, असं सांगणारा असंस्कृत विकृत माणूस भीमा कारखान्याचा नेता म्हणून तुम्हाला चालणार आहे का? असे म्हणत उमेश पाटील यांनी राजन पाटलांचा समाचार घेतला. राजन पाटील यांच्यावर टीका करताना उमेश पाटील यांनी देखील आक्षेपार्ह टिपण्णी केली आहे. राजन पाटील यांच्यासारखा घाणरेडा नेता मोहोळ तालुक्याचा तीन वेळा आमदार झाला. याची आम्हाला लाज वाटत असल्याचे उमेश पाटील म्हणाले. पाटील म्हणून घ्यायची लाज वाटेल असेही उमेश पाटील म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8AM 31 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सAjit Pawar Beed : धनंजय मुंडेंच्या विरोधकांनाही अजितदादांचा धक्का, दादागिरीमुळे बीडला शिस्त लागेल?Chandrakant Patil Meet Uddhav Thackeray: ठाकरे आणि भाजपमधल्या जुन्या मित्रांना युती हवी?ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 7AM 31 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Budget Session : आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
आजपासून 18 व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन; राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार, आर्थिक सर्वेक्षणही सादर होणार
Dhananjay Munde & Suresh Dhas: बीड डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
बीडच्या बैठकीत धनंजय मुंडे अन् सुरेश धस यांच्यात जोरदार शा‍ब्दिक चकमक, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
मोठी बातमी: भगवान गडावरुन संदेश आला! धनंजय मुंडेंना नामदेवशास्त्रींचा भक्कम पाठिंबा
Guillain-Barré Syndrome outbreak : कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
कोल्हापूर, सांगलीनंतर आता सातारा आणि कराडमध्येही जीबीएसचा शिरकाव
Beed Crime: अजितदादांकडून छातीचा कोट करुन धनंजय मुंडेंचा बचाव, कदाचित त्यांना मीपणा करणारे आवडत असावेत: जितेंद्र आव्हाड
धनंजय मुंडे नशीबवान, एवढं होऊनही अजितदादा छातीचा कोट करुन उभे राहिले, जितेंद्र आव्हाडांची पोस्ट व्हायरल
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
Maharashtra Breaking News Live Updates: कर्जतचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणीत वाढ
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
IND vs ENG : भारत इंग्लंड पुण्यात आमने सामने येणार, टीम इंडियाकडे मालिका विजयाची संधी, एका कारणामुळं सूर्यकुमारचं टेन्शन वाढणार
भारताकडे मालिका विजयाची संधी, पुण्यातील जुन्या रेकॉर्डनं टेन्शन वाढवलं, टीम सूर्या कमाल करणार?
Embed widget