विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची स्वबळाची चाचपणी; राज्यातील 288 मतदारसंघातून मागवले इच्छुकांकडून अर्ज
Maharashtra Congress : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाची चाचपणी करत असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून काँग्रेसने अर्ज मागवले असल्याचे समोर आले आहे.
Vidhan Parishad Election 2024 मुंबई : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने जवळजवळ सर्वच राजकीय पक्षाने मोर्चे बांधणी करायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महाविकास आघाडीला राज्यात मिळालेल्या यशानंतर मविआचा (Mahavikas Aghadi) आत्मविश्वास बळावला आहे. अशातच आज मुंबईत मविआच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत विधान परिषदेच्या निवडणूक संदर्भात चर्चा होण्याचीही शक्यता आहे.
असे असताना अकोल्यात मात्र एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. राज्यातील 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून काँग्रेसने (Congress) अर्ज मागवले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाविकस आघाडीत प्रमुख पक्ष असून देखील आगामी विधानसभेसाठी काँग्रेस प्लॅन बी तयार करत तर नाहीये ना? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.
काँग्रेसने मागवले राज्यातील 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने राज्यातील 288 मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागवले असल्याचे समोर आले आहे. 10 जुलैपर्यंत प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात हे अर्ज जमा करण्याचे आवाहन एका परिपत्रकातून करण्यात आले आहे. अर्जासोबत सर्वसाधारण उमेदवारांना पक्षनिधी म्हणून 20 हजाररुपये जमा करावे लागणार आहे. तर अनुसुचित जाती, जमाती आणि महिला उमेदवारांना 10 हजार रूपये भरावे लागणार आहेत. एकीकडे राज्यात महाविकास आघाडीत लढायचं ठरलेलं असतांना काँग्रेसचं 'प्लॅन बी' वर काम करणं सुरू केलंय का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळातू उपस्थित केला जातोय. त्यामुळे आता आगामीकाळात राज्याच्या राजकारणात काय वेगळं वळण लागतं हे पाहणे महातवाचे ठरणार आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जणांनी उमेदवारी अर्ज
एकीकडे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. महायुतीकडून (Mahayuti) 9 उमेदवार रिंगणात असून महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) तीन जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. 12 पैकी एका उमेदवाराने माघार घेतली तरच निवडणूक बिनविरोध झाली असती. मात्र, ही शक्यता जवळ जवळ मावळली आहे. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीकडून आपले सर्व उमेदवार जिंकून येणार, असा दावा करण्यात येत असून आता नेमकं कोणत्या एका उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर संबंधित बातम्या :