एक्स्प्लोर

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबत  कौशल्य आधारित शिक्षण मिळणार, राज्य सरकारचा  इन्फोसिस कंपनीसोबत सांमजस्य करार

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सांमजस्य करार केला असून त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आता नियमित शिक्षणासोबत  कौशल्य आधारित शिक्षण मिळणार आहे. 

मुंबई : राज्यातील महाविद्यालयीन  विद्यार्थ्यांना नियमित शिक्षणासोबतच कौशल्य आधारित शिक्षण मिळावे आणि नवीन कौशल्य आधारित तांत्रिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धीसाठी उपयोग व्हावा म्हणून उच्च व तंत्रशिक्षण विभागाने इन्फोसिस कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. आज मंत्रालयात उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि इन्फोसिस कंपनी यांच्यात सामंजस्य करार झाला. यामुळे जवळपास 40 लाख विद्यार्थ्यांना आणि एक लाख प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना उपयोग होणार आहे. हे शिक्षण पूर्णपणे इन्फोसिसकडून मोफत असून याचा राज्य शासनावर आर्थिक भार पडणार नाही.

इन्फोसिस या कंपनीने सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत विविध विषयांवरील आणि विविध कालावधीचे 3 हजार 900 पेक्षा अधिक ऑनलाईन कोर्सेस तयार केले असून हे सर्व कोर्सेस कंपनीच्या स्प्रिंग बोर्ड (Spring Board) या ऑनलाईन मंचावर उपलब्ध करुन दिले आहेत. हे अभ्यासक्रम राज्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नि:शुल्क आणि औपचारिक (formal) अभ्यासक्रमासोबतच उपलब्ध राहणार आहेत. पथदर्शी प्रकल्प म्हणून नागपूर येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि रत्नागिरी तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
            
यामध्ये संगणकाच्या प्रोग्रामिंग भाषा, क्लाउड तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दिमत्ता यासारख्या तांत्रिक कोर्सेस सोबतच बिझिनेस कम्युनिकेशन, बिझिनेस इंग्लिश, अर्थशास्त्र, लेखन कौशल्य, सकारात्मकता, नेतृत्व कौशल्य इत्यादी विषयांचे कोर्सेस असणार आहेत, असे उदय सामंत यांनी सांगितले. या सामजंस्य करारामुळे तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत 1 हजार 600 महाविद्यालयातील 10 लाख  विद्यार्थ्यांना आणि उच्च शिक्षण संचालनालयाअंतर्गत 3 हजार  महाविद्यालयातील 30 लाख  विद्यार्थ्यांना अशा एकूण ४० लाख विद्यार्थ्यांना या उपक्रमामुळे फायदा होणार आहे.

काय आहेत या उपक्रमाची वैशिष्ट्ये?
या मंचावरील कृती प्रवण ( Learn By Doing ) अध्ययनामुळे रोजगारासाठी आवश्यक व्यावसायिक कौशल्ये विकसित करून रोजगारक्षमता वाढविण्यासाठी या कोर्सेसची  विद्यार्थ्यांना मदत होईल.

● अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रोग्रामिंग लॅंग्वेजेस, प्रकल्प व्यवस्थापन, संभाषण कौशल्ये इत्यादी व्यवसायाभिमुख कौशल्ये प्राप्त करण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व व्यावसायिक रोजगारविषयक कौशल्ये प्राप्त होतील.

● उच्च शिक्षण संस्थामधील शिक्षक वर्गाला या मंचावर उपलब्ध सर्व कोर्सेस वापरता येतील.

● उपक्रमाअंतर्गत डिजीटल किंवा आभासी पद्धतीच्या वर्ग खोल्या तयार करुन त्याद्वारे विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचे काम संस्था करु शकतील. तसेच याद्वारे ऑनलाईन परिक्षा घेण्याची देखील सुविधा उपलब्ध आहे.

● स्प्रिंगबोर्ड मंचावर उपलब्ध कोर्सेस विद्यार्थ्याकरिता वैकल्पिक कोर्सेस म्हणून शिकविता येतील व त्यासाठी शिक्षक वर्ग त्यांच्या आवश्यकतेनुसार अभ्यासक्रमाचे संचालन करतील.

महाराष्ट्र राज्य अध्यापक प्रशिक्षण संस्था जे अभ्यासक्रम किंवा प्रशिक्षण वर्ग राबविणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले डिजीटल कंटेट तयार करणे, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम तयार करणे, विद्यार्थ्याचे मूल्यमापन करण्याचे तंत्र इत्यादी बाबींचे प्रशिक्षण देखील इन्फोसिस कंपनीच्या विषय तज्ञामार्फत दिले जाईल.

● शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी आणि शासकीय विज्ञान संस्था, नागपूर या संस्थांसाठी खास करून तयार केलेल्या अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना वरील सर्व सुविधासोबतच प्रोजेक्ट इंटनशिप बद्दलची सुविधा आणि एलएमएसची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे. प्रोजेक्ट इंटर्नशिप आणि व्यवसायिक कौशल्य वाढविणाऱ्या कोर्सेसमुळे या दोन्ही संस्थांतील विद्यार्थी रोजगारक्षम होण्यास मदत होईल.

संबंधित बातम्या : 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचा महायुतीला घरचा आहेर; माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप, अब्दुल सत्तारांना पाठिंबा देत म्हणाले की, 'एकमेकांचे खच्चीकरण करणे...'
संजय गायकवाडांचा महायुतीला घरचा आहेर; माझ्या मतदारसंघातही मित्रपक्षाचा हस्तक्षेप, अब्दुल सत्तारांना पाठिंबा देत म्हणाले की, 'एकमेकांचे खच्चीकरण करणे...'
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Pune News : पुणे-पिंपरी दारूकांड प्रकरणी मोठी अपडेट; पोलीस दलातील आणखी चार कर्मचारी निलंबित, मुख्य आरोपीच्या संपर्कांत असल्याचा ठपका, आत्तापर्यंत 29 जणांचे निलंबन
पुणे-पिंपरी दारूकांड प्रकरणी मोठी अपडेट; पोलीस दलातील आणखी चार कर्मचारी निलंबित, मुख्य आरोपीच्या संपर्कांत असल्याचा ठपका, आत्तापर्यंत 29 जणांचे निलंबन
Eknath Shinde and Abdul Sattar: ठाण्यात मध्यरात्री बैठक, एकनाथ शिंदेंची अब्दुल सत्तारांना महत्त्वाची सूचना, म्हणाले, 'नियम पाळा...'
ठाण्यात मध्यरात्री बैठक, एकनाथ शिंदेंची अब्दुल सत्तारांना महत्त्वाची सूचना, म्हणाले, 'नियम पाळा...'

व्हिडीओ

Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Ladki Bahin Yojana Special Report:81 लाख महिला अपात्र;विरोधकांची अदिती तटकरेंच्या राजीनाम्याची मागणी
Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime news: कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीवर प्रियकरासह चौघांचा अत्याचार, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
कोल्हापूर हादरलं! महाविद्यालयीन तरुणीसोबत प्रियकरासह चार जणांचं नको ते कृत्य, अश्लील व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेलिंग
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
अनिकेत तटकरेंचा मार्ग होणार सोपा, कोकणातील शिवसेनेचं बंड होणार थंड, जुईली दळवी घेणार माघार, सुत्रांची माहिती
Farmers Loan Waiver Maharashtra: शेतकरी कर्जमाफीसाठी कोणकोणते पदाधिकारी अपात्र, 25 हजारापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांनाही लाभ नाही, वाचा निकषांची ए टू झेड माहिती
शेतकरी कर्जमाफीसाठी कोणकोण अपात्र ठरणार? 25 हजारापेक्षा जास्त पगार असणाऱ्यांनाही लाभ नाही, वाचा निकषांची ए टू झेड माहिती
Solapur : सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
सोलापुरात उमेदवाराचा भयंकर कारनामा; 10 पैकी 5 सूचकांच्या बोगस सह्या, विधान परिषदेचा अर्ज बाद; फौजदारी गुन्हा दाखल होणार?
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
काँग्रेसमुळे भाजपची डोकेदुखी संपली; विधानपरिषदेसाठी बंडखोर विप्लव बाजोरियांचा उमेदवारी अर्ज बाद
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Maharashtra Live blog updates: मुंबईच्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी, पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात
Embed widget