एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : नाराजी दूर झाली, महायुतीच्या मंत्रिमंडळात दमदार एन्ट्री; नगरसेवक ते मंत्री, कशी आहे भुजबळांची कारकीर्द?

Chhagan Bhujbal Oath Ceremony : भुजबळांनी शिवसेनेतून नगरसेवक पदापासून सुरुवात केली. त्यांनी राज्यातील उपमुख्यमंत्रीपदासह अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. 

Chhagan Bhujbal Profile : आज राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तर उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी शपथ घेतली. यावेळी नाशिक जिल्ह्यातून छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून मंत्री पदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात छगन भुजबळ यांच्या राजकीय कारकि‍र्दीबाबत

छगन भुजबळ यांचा जन्म 15 ऑक्टोबर, 1947 रोजी नाशिक येथे झाला. त्यांनी मुंबईतील व्ही. जे. टी. आय.मधून मेकॅनिकल इंजिनियरिंगमधील पदविकेपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. तरुणपणीच त्यांनी शेती व शेतीवर आधारित व्यवसाय केला. त्यामुळे त्यांना शेतीची आवड निर्माण झाली. मात्र शेतीसोबतच अगदी सुरुवातीपासून राज्याच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात देखील त्यांना रस होता त्यामुळे ते राजकारणाकडे वळाले.

Chhagan Bhujbal Political Journey : शिवसेनेतून नगरसेवक म्हणून सुरूवात 

भुजबळ यांची राजकारणाची सुरुवात ही शिवसेना पक्षातून झाली आहे. त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर 1973 साली मुंबई महापालिकेवर नगरसेवक म्हणून निवड झाली होती. त्यानंतर 1973 ते 84 या काळात त्यांनी मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. यानंतर 1985 मध्ये पहिल्यांदा तर 1991 मध्ये दुसऱ्यांदा त्यांनी मुंबईचे महापौर होण्याचा मान मिळविला. 

युतीच्या काळात मंत्रिपदाची संधी

त्यानंतर 1985 व 1990 या काळातील सलग दोन विधानसभेच्या निवडणुकीत मुंबईतील माझगावमधून मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेवर निवड गेले. यानंतर भुजबळ यांनी नोव्हेंबर 1991 ते 1995 या विधानसभेच्या कार्यकाळात राज्याच्या महसूलमंत्री,  गृहनिर्माण आणि झोपडपट्टी सुधारणा या खात्याचे मंत्री म्हणून काम केले.

शरद पवारांच्यासोबत राष्ट्रवादीत गेले

यानंतर भुजबळ यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी प्रवेश केला. त्यानंतर राज्यात भाजप शिवसेना युतीचे सरकार आल्यावर त्यांची एप्रिल 1996 मध्ये विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तेव्हापासून भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. तसेच या पक्षाचे ते महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत. त्यामुळे छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते असून ते महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री राहिले आहेत.

1999 साली काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात आल्यावर भुजबळ यांनी 18 ऑक्टोबर 1999 रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन खाती देखील सांभाळली. तर एप्रिल 2002 मध्ये त्यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाल्यावर एप्रिल 2002 ते 23 डिसेंबर 2003 या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री या दोन्ही पदाची धुरा सांभाळली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बनले

त्यानंतर भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघातून 2004 मध्ये विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणूकीत ते विजयी झाले. यावेळी राज्यात पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार आले असता त्यांनी नोव्हेंबर 2004 ते 3 डिसेंबर 2008 या कालावधीत सार्वजनिक बांधकाममंत्री तर 8  डिसेंबर 2008 रोजी पुन्हा एकदा  महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपद भूषविले. भुजबळ हे येवला मतदारसंघातून 2009 मध्ये दुसऱ्यांदा, 2014 मध्ये तिसऱ्यांदा, 2019 मध्ये चौथ्यांदा तर 2024 मध्ये सलग पाचव्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. 

दि. ११ नोव्हेंबर २०१० रोजी राज्य मंत्रिमंडळाची पुनर्रचना करण्यात आली असता या फेररचनेमध्ये भुजबळ यांच्याकडील सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) विभागाच्या मंत्री पदाचा कार्यभार कायम ठेवून त्यांच्यावर पर्यटन विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये दि.२८ नोव्हेंबर २०१९ पासून त्यांच्यावर राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. युती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर भुजबळ यांच्यावर २ जुलै २०२३ रोजी पुन्हा राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत.

दरम्यान भुजबळ यांनी राजकीय कारकीर्दीत आधी शिवसेना व नंतर राष्ट्रवादीसाठी अतिशय महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या विकासप्रक्रियेत देखील ते सातत्याने मोलाची कामगिरी बजावत आले आहेत.

विविध संस्थांवर काम

छगन भुजबळ यांनी मुंबईतील नायर हॉस्पिटल, प्रिन्स आगाखान हॉस्पिटल, व्ही. जे. टी. आय. संस्थांवर ट्रस्टी म्हणून काम केले आहे. तसेच वांद्रे - मुंबई येथे मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट (एम. ई. टी.) या शैक्षणिक संस्थेची देखील स्थापना केली आहे.

विविध देशांना भेटी दिल्या

भुजबळ महापौर असताना त्यांनी १९० मध्ये ऑल इंडिया कौन्सिल ऑफ मेयर्स या संघटनेचे अध्यक्षपद भूषविले. तसेच ओसाका, जपान येथे १९९० साली झालेल्या जगातील महापौरांच्या परिषदेत शिष्टमंडळासह ते सहभागी झाले होते. तर १९८० आणि १९८६ मध्ये भुजबळ यांनी व्यापक परदेशी दौरा केला. त्यांनी अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, नेदरलँड, बेल्जियम, स्वित्झरलँड आणि रशिया या देशांना भेटी दिल्या. 

तसेच ऑक्टोबर 2000 मध्ये भुजबळ यांनी फ्रान्स, जर्मनी व इंग्लंड या देशांचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने 28 मे ते 18 जून, 2001 या काळात न्यूयॉर्क, जिनीव्हा, लंडन या शहरांचा दौरा केला.  तर 2002 या वर्षी केंद्रीय पर्यटन तसेच नागरी हवाई उड्डाण मंत्री यांनी मध्य पूर्वेतील तसेच पश्चिम आशियाई देशातील पर्यटकांना भारतात आकृष्ट करण्यासाठी नेलेल्या शिष्टमंडळात भुजबळ यांना निमंत्रित केले होते. त्यानुसार भुजबळ यांनी दि.19 मे ते 24 मे, 2002 या कालावधीत दुबई, बहरीन, मस्कत आणि अबुधाबी या देशांचा दौरा करुन महाराष्ट्रातील पर्यटन वाढविण्याचा प्रयत्न केला.

भुजबळ यांनी पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर, 2002 या कालावधीत अमेरिका,कॅनडा आणि युनायटेड किंगडम या देशांना भेटी दिल्या. तसेच 6 ते 14 नोव्हेंबर 2002 या कालावधीत लंडन येथे भरलेल्या वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट या जागतिक पर्यटन विषयक प्रदर्शनास भेट देण्यासाठी व महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाची या प्रदर्शनामार्फत जागतिक पातळीवर प्रसिध्दी करण्यासाठी त्यांनी लंडनला भेट दिली. तर भारत भेटीवर आलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची छगन भुजबळ यांनी दि. 5 नोव्हेंबर, 2010 रोजी मुंबई येथे भेट घेतली आणि त्यांना महात्मा ज्योतीराव फुले यांनी लिहिलेल्या 'गुलामगिरी' या पुस्तकाचा 'स्लेव्हरी' हा अनुवाद ग्रंथ भेट दिला. 

त्या काळात अद्ययावत माहिती देणारी प्रसारमाध्यमे किंवा साधनसामग्री नसतानाही महात्मा फुले यांनी हे पुस्तक अमेरिकेतील अफ्रो-अमेरिकन जनतेच्या लढयाला अर्पण केल्याची बाब भुजबळ यांनी  ओबामा यांना सांगितली. त्यावेळी स्वत: ओबामा सुध्दा काही क्षण अवाक झाले आणि 'इट इज अ ग्रेट-ग्रेट गिफ्ट फॉर मी' अशा शब्दांत  भुजबळ यांचे आभार मानले. अमेरिकेत परतल्यानंतर ओबामा यांनी भुजबळ यांना प्रतिभेटीदाखल एक स्वाक्षांकित चांदीचा ग्लास पाठविला.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget