एक्स्प्लोर

राज्यसभेसाठी भाजपच्या 'या' नेत्यांच्या नावाची यादी दिल्लीत पोहचली; लवकरच अंतिम निर्णय

Rajya Sabha Election : राज्यातून भाजपकडून राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे. 

मुंबई : येत्या 27 फेब्रुवारी रोजी राज्यसभेसाठी निवडणूक (Rajya Sabha Election) पार पडणार असून, यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यातील पाच जागा महायुतीच्या वाट्याला येण्याची शक्यता वर्तवली जात. या पाच जागांपैकी तीन जागा भाजपच्या (BJP) वाट्याला येणार आहेत. अशात भाजपकडून राज्यसभेसाठी 9 उमेदवारांच्या नावाची यादी समोर येत असून, ती दिल्लीला पाठवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातून भाजपकडून राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे. 

भाजपकडून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत नारायण राणे (Narayan Rane), विनोद तावडे (Vinod Tawde), पंकजा मुंडे (Pankaja Munde), विजया राहटकर (Vijaya Rahatkar), अमरीश पटेल (Amrish Patel), माधव भंडारी (Madhav Bhandari), चित्रा वाघ (Chitra Wagh), हर्षवर्धन पाटील (Harsh Vardhan Patil) आणि संजय उपाध्याय ( Sanjay Upadhyay) यांचे नावं आहेत. त्यामुळे या नऊ नेत्यांपैकी कोणाच्या गळ्यात राज्यसभेच्या उमेदवारीची माळ पडणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 

पंकजा मुंडेंना संधी मिळणार का? 

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांना सतत पक्षाकडून डावलण्यात येत असल्याचा आरोप सतत होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पंकजा मुंडे यांना डावलण्यात येत असल्याचा आरोप देखील झाला. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या नावाची चर्चा असतांना तेव्हा देखील त्यांना संधी मिळाली नाही. अशात आता राज्यसभेसाठी होत असलेल्या निवडणुकीच्या उमेदवारीच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे यंदा तरी पंकजा मुंडे यांना संधी मिळणार का? आणि त्यांना राज्यसभेवर पाठवले जाणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. विशेष म्हणजे कालच पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आहे. त्यामुळे या भेटीत राज्यसभेच्या उमेदवारी बाबत काही बोलणं झाले का? याबाबत चर्चा आहे. तर, यावर बोलतांना फडणवीस म्हणाले की, पंकजा मुंडे आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीबाबत नवीन काही नाही. तसेच पंकजा मुंडे यांना राजसभेची उमेदवारी देण्याबाबतचा निर्णय वरिष्ठ घेतील, असेही फडणवीस म्हणाले. 

महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल

भाजप : 104, 
राष्ट्रवादी (अजित पवार गट) : 42
 शिवसेना (एकनाथ शिंदे गट): 40
काँग्रेस : 45
शिवसेना उद्धव ठाकरे गट : 16
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : 11
बहुजन विकास आघाडी : 3, 
समाजवादी पक्ष, एआयएम आणि प्रहार जनशक्ती प्रत्येकी 2, 
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीआयएम, शेकाप, स्वाभिमानी पक्ष, रासप, जनसुराज्य शक्ती, क्रांतिकारी शेतकरी पक्ष प्रत्येकी 1 
अपक्ष 13

इतर महत्वाच्या बातम्या: 

Sanjay Raut : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार करावा; संजय राऊतांची थेट मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
Ratnagiri Rains: रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Thane To CSMT Canceled : ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या रेल्वे रद्दMumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीरPanchavati Express Canceled : मनमाडहून मुंबईला येणारी पंचवटी एक्सप्रेस रद्दMumbai Monsoon Rain : सायन, कुर्ला, विक्रोळी, भांडूप स्टेशनवर रुळांवर पाणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
Mumbai Schools Heavy rain : मुंबई पालिकेच्या शाळांना सुट्टी, सकाळच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर
Ratnagiri Rains: रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
रत्नागिरीला पावसानं झोडपलं; दिवसभरात मुसळधार पावसाचा इशारा, जिल्ह्यातील शाळांना सुट्टी
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Who is Bollywood No. 1 Actor :  शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
शाहरुख, आमीर की आणखी कोण? बॉलिवूडचा नंबर वनचा अभिनेता कोण? कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्राने नावच उघड केलं
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
Embed widget