Kirit Somaiya : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून जनतेची फसवणूक ; किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल
Kirit Somaiya : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेची फसवणूक करत आहेत, असा हल्लाबोल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
![Kirit Somaiya : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून जनतेची फसवणूक ; किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल bjp leader kirit somaiya allegations on cm uddhav thackeray and rashmi takry Kirit Somaiya : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून जनतेची फसवणूक ; किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/11/02/a37edaeb8198083ebff87f7b638105a9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kirit Somaiya : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जनतेची फसवणूक करत आहेत, असा हल्लाबोल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. शिवसेने पाठवलेल्या पत्राचं वाचन किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केलं. यावेळी सोमय्या यांनी शिवसेना नेते खासदार संजज राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी कोर्लई गावच्या सरपंचांना पाठवलेल्या पत्राचंही वाचन सोमय्या यांनी यावेळी केलं. किरीट सोमय्या म्हणाले, "पत्र रश्मी ठाकरे यांनी पाठवलं असलं तरी त्यात भाषा उद्धव ठाकरे यांची आहे. कारण उद्धव ठाकरे यांना विचारल्याशिवाय रश्मी ठाकरे पत्र लिहिणार नाहीत. या पत्रावर सरपंचांची सही आहे. यावर मुख्यमंत्री का बोलत नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे यांना पत्नीची बाजू घ्यायची नाही काय? मुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीत. ते जनतेची फसवणूक करत आहेत, असा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी केला.
"रश्मी ठाकरे यांनी केलेल्या जमीन व्यवहारावर उद्धव ठाकरे बोलत नाहीत. ते सरपंचांना पुढे करत आहेत. या प्रकरणी करण्यात असलेल्या आरोपांवर बोलण्याची शिवसेनेच्या एकाही नेत्याची हिम्मत नाही. शिवसेच्या नेत्यांध्ये फक्त स्पर्धा लागल्याचा हल्लाबोल किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.
संजय राऊत यांनी 11 ऑक्टोबर 2021 रोजी किरीट सोमय्या यांना पत्र पाठवलं होतं. त्याचां वाचनही किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केलं. "शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या तोंडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाषा असल्याची टीका किरीट सोमय्या यांनी यावेळी केली आहे. सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले. याबरोबरच संजय राऊत यांनी वापरलेल्या भाषेबाबत सोमय्या आक्रमक झाले.
"संजय राऊत यांनी जी भाषा वापरली ती उद्धव ठाकरे यांच्या मार्फत वापली आहे. त्यांचे घोटाळे बाहेर पडत आहेत, त्यामुळे ते माझ्यावर खालच्या पातळीवरील भाषेत टीका करत आहेत. परंतु, माझ्याकडे सर्व घोटाळ्यांचे पुरावे आहेत, असा इशारा सोमय्या यांनी यावेळी दिला.
महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)