एक्स्प्लोर

मराठा आरक्षण महाविकास आघाडीने घालवलं; त्या काळचे मंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसून देवेंद्र फडणवीसांचा आरोप, फडणवीसांचा निशाणा कुणावर? 

Maratha Reservation : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असताना त्यासंबंधित नेमलेल्या उपसमितीमध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील होते. मग देवेंद्र फडणवीसांचे आरोप नेमके कुणावर? 

मुंबई: लाठीचार्जचा आदेश (Jalna Marath Protest) हा मंत्रालयातून देण्यात आला नव्हता, तशा बातम्या पेरल्या जात आहेत. मावळमध्ये झालेला गोळीबार हा त्या काळच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून झालेला का? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असताना मराठा आरक्षण (Devendra Fadanvis On Maratha Reservation) आलं होतं, मात्र महाविकास आघाडीच्या सरकारने ते घालवलं असा आरोपही त्यांनी केला. विशेष म्हणजे फडणवीस हे आरोप करताना त्यांच्या शेजारी महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे बसलेले. फडणवीसांनी महाविकास आघाडीवर म्हणजे पर्यायाने त्यांच्यावर केलेले आरोप शेजारी बसणाऱ्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मान्य आहेत का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 

जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर आता मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. पोलिसांना लाठीचार्जचा आदेश हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला. तसेच देवेंद्र फडणवीसांमुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोपही विरोधी पक्षांनी केला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्टीकरण दिलं. 

अजित पवार आणि एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष आरोप?

आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आधीच्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीवर चांगलंच तोंडसुख घेतलं. ते म्हणाले की, "आपण 2018 साली मराठा आरक्षणाचा कायदा केला. हा कायदा देशात फक्त तामिळनाडू आणि महाराष्ट्र या दोन राज्यांतच होता. त्यानंतर राज्यात भाजपचं सरकार जाऊन उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आलं. सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर रोजी याला स्थगिती दिली. त्यानंतरही उद्धव ठाकरे हे पुढचे एक वर्षे मुख्यमंत्री होते. पण त्या काळात उद्धव ठाकरे यांनी वटहुकूम का काढला नाही? आम्ही दिलेलं आरक्षण हे महाविकास आघाडी सरकारने घालवलं.  जे नेते मराठा समाजाचा पुळका आले असे दखवत आहेत त्यांनी आरक्षण घालवलं."

देवेंद्र फडणवीस हे आरोप करताना त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार होते. महत्त्वाचं म्हणजे अजित पवार महाविकास आघाडी सरकामध्ये उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे हे त्यावेळी नगरविकास मंत्री होते. 

आता देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीवर आरोप करताना त्या काळच्या मराठा आरक्षणासंबंधीच्या उपसमितीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे देखील होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे आरोप हे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे होते का? असा सवालही उपस्थित होतोय.

एकनाथ शिंदेंनी यावर बोलताना सांगितलं की, आम्ही महाविकास आघाडीने नेमलेल्या उपसमितीमध्ये केवळ सदस्य होतो, अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री नव्हतो.

दुसरीकडे अजित पवार यांनी सांगितलं की, महाविकास आघाडीमध्ये आम्ही जरी असलो तरी त्या आघाडीचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांची जबाबदारी होती. एक प्रमुख म्हणून कोणत्याही कामाची जबाबदारी ही त्यांची होती. यावर राजकारण कुणीही करू नये. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
जळगावमध्ये 2000 महिलांनी नाकारली लाडकी बहीण योजना; महिला बालकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश
आजवर किती मंत्र्यांच्या आस्थापनांवर धाड टाकली, उच्च न्यायालयाची तुकाराम मुंढेंच्या FDA ला विचारणा, दिले महत्त्वाचे निर्देश

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget