एक्स्प्लोर

Ashadhi Wari 2022 Live updates : नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची पूजा; पाहा यात्रेचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Ashadhi Wari 2022 : आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज पालख्यांचं पंढरपुरात आगमन होणार आहे. उद्या एकादशी आहे, त्यासाठी पंढरीत लगबग सुरु आहे. पाहा आषाढीचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

LIVE

Key Events
Ashadhi Wari 2022 Live updates : नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची पूजा; पाहा यात्रेचे प्रत्येक अपडेट्स एका क्लिकवर

Background

Ashadhi Ekadashi 2022 : आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) आहे. याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. गेली 20 वर्ष शेती करून आपल्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या नवले कुटुंबात 1987पासून वारीची परंपरा सुरु आहे. मुरली नवले हे दरवर्षी न चुकता सलग वारी करत आहेत. तसेच, ते श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातही गेल्या 12 वर्षांपासून पायी वारी करत आहेत.

मुख्यमंत्री सहकुटुंब हजर

विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाचे नियम पाळून महापूजा करावी लागली आहे. यावेळी मुख्यमंत्री कोणतेही राजकीय कार्यक्रम घेऊ शकणार नाहीत. निवडणूक आयोगाच्या काही अटी-शर्थींवरचा पूजेची परवानगी देण्यात आली होती.

विठुरायाच्या पूजेनंतर मुख्यमंत्र्यांचा पुढील कार्यक्रम

विठूरायाची पूजा संपन्न झाल्यानंतर पहाटे 5.30 वाजता - पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमीपूजन

पहाटे 5.45 वाजता - पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे नदीघाटाचे लोकार्पण

सकाळी 11.15 वाजता - शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ

सकाळी 11.45 वाजता- पंचायत समिती, पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप कार्यक्रम

कोरोनामुळे तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा भाविकांना आणि वारकऱ्यांना त्यांच्या विठुरायाचे थेट दर्शन घेता येणार आहे. विठूरायाला डोळे भरून पाहण्यासाठी सगळेच भाविक आतुर झाले आहेत. लाखोंच्या संख्येने लोक आज पंढरपुरात आले आहेत. दिंडी, वारी, विठुरायाची भजनं, अभंगांनी आज मंदिराचा परिसर दुमदुमला आहे.

06:32 AM (IST)  •  10 Jul 2022

विठुरायाच्या पूजेवेळी शिंदे घराण्याच्या चार पिढ्या उपस्थित

पंढरपूर : आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2022) निमित्ताने विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या संपूर्ण कुटुंबासह उपस्थित होते. यावेळी त्यांचे वडील संभाजी, एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता, मुलगा श्रीकांत आणि नातू देखील पूजेसाठी उपस्थित होते. पंढरपुरात नगरपालिका आचारसंहिता लागू झाली आहे. 

06:30 AM (IST)  •  10 Jul 2022

नातवाला कडेवर घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली विठ्ठल रुक्मिणीची पूजा

आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2022) आहे. याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली. यावेळी नातवाला कडेवर घेत त्यांनी विठुरायाची पूजा केली आहे. मुख्यमंत्री पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.

06:26 AM (IST)  •  10 Jul 2022

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली विठुरायाची पूजा

आज आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi 2022) निमित्ताने महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांची पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा पार पडली आहे.

05:32 AM (IST)  •  10 Jul 2022

आषाढी एकादशी निमित्ताने वडाळा येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी!

आज आषाढी एकादशी निमित्ताने मुंबईच्या वडाळा इथल्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. पहाटे 3 वाजल्पायासून विठ्ठल मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी सुरू करण्यात आले आहे. रात्रीपासून भाविक मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. मंदिरात भजन कीर्तन मोठ्या जल्लोषात सुरू आहे. तब्बल दोन ते अडीच वर्षानंतर कोरोनाच्या संकंटानंतर पहिल्यांदा वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात (प्रति पंढरपूर) मोठ्या जल्लोषात आषाढी एकादशीचा उत्सव साजरा केला जात आहे. या वेळी भाविकांच्या मनामध्ये मोठा उत्साह आहे. याच मंदिरात पहाटे 4 वाजता पहिल्या आरतीसाठी मुंबईच्या माजी महापौर किशोरी ताई पेडणेकर देखील उपस्थित होत्या.

18:31 PM (IST)  •  09 Jul 2022

Pandharpur : पंढरपूर मध्ये भक्तांचा महापूर

Pandharpur : आळंदी आणि देहूवरून निघालेले लाखो वारकरी आता पंढरपूरमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. वारकरी आता चंद्रभागेमध्ये स्नान करून पुढे नामदेव पायरीच दर्शन घेत आहेत. विठुरायाच्या भेटीची आस मनामध्ये घेऊन हे वारकरी चालत पंढरपूरपर्यंत पोहोचले आहेत आणि नामदेव पायरी बरोबरच ते आता आपल्या विठुरायाचे देखील दर्शन घेणार आहेत. पंढरपूर मध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झालेले वारकरी अगोदर चंद्रभागेमध्ये स्नान करतात आणि नंतरच विठुरायाच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभे राहतात वारकऱ्यांना स्नान करण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं म्हणून चंद्रभागेमध्ये दुथडी  भरून स्वछ पाणी सोडण्यात आले आहे. वारकऱ्यांबरोबरच काही हुलडबाज तरुण देखील चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी येतात आणि यावेळी काही अवचित प्रकार घडू नये म्हणून एनडीआरएफची पथकं चंद्रभागेमध्ये तैनात करण्यात आली आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षतेसाठी 24 तास ही पथकं चांद्रभागेमध्ये गस्त घालत आहेत. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये कोणीही हुल्लडबाजी करू नये अस आव्हान एनडीआरएफच्या पथकाने केलं आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget