एक्स्प्लोर

Amravati Lok Sabha Election : 'चर्चेत राहण्यासाठी बच्चू कडूंचा हा पब्लिसिटी स्टंट'; आमदार रवी राणांची बोचरी टीका 

Ravi Rana : कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सायन्स कोर मैदान हे योग्य असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं दिला होता. त्यामुळे बच्चू कडू हे विनाकारण नौटंकी करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केलाय.

Ravi Rana On Bacchu Kadu अमरावती : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघातील (Amravati Lok Sabha Constituency) महायुतीच्या भाजपच्या उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana) प्रचारार्थ आज अमित शाहांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, या सभेला आता वादाची किनार लाभली आहे. याला कारण ठरलंय ते अमरावती शहरातील सायन्स कोर मैदान. या मैदानावरूनच काल राणा दाम्पत्य आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आलाय. अशातच आता या प्रकरणात दोन्हा गटाकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येते आहेत.

'बच्चू कडू विनाकारण नौटंकी करतात, असा आरोप रवी राणांनी केला आहे. बच्चू कडूंना चर्चेत राहण्यासाठी त्यांनी हा पब्लिसिटी स्टंट केलाय', असा टोलाही त्यांनी बच्चू कडूंना लगावलाय.  त्यामुळे काल झालेल्या हाई वोल्टेज ड्रामानंतर आता राणा दाम्पत्य आणि बच्चू कडूमध्ये शाब्दिक चकमक रंगताना दिसत आहे. 

बच्चू कडूंचा राजकिय पोळी शेकण्याचा प्रयत्न - रवी राणा 

यावर बोलताना रवी राणा यांनी म्हटलं की, 'अमरावतीमध्ये सांस्कृतिक भवनात शरद पवारांचा (Sharad Pawar) कार्यक्रम होता. ते सांस्कृतिक भवन मी बुक केलेले होते. मात्र, शरद पवार आणि उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) हे त्या ठिकाणी येत असल्याने माझे बुकिंग रद्द करण्यात आलं. तसेच परतवाडा येथे देखील राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा होत असल्याने ते ग्राउंड आधीच योगी आदित्यनाथ यांच्या सभेसाठी आम्ही बुक केले असले तरी राहुल गांधींच्या सभेसाठी दिलं. असे असताना देशाच्या गृहमंत्र्याच्या सभेच्या अनुषंगाने आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सायन्स कोर मैदान हे योग्य असल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनानं दिला होता. त्यामुळे बच्चू कडू (Bacchu Kadu) हे विनाकारण नौटंकी करत आहेत.' त्याचप्रमाणे ते आपली राजकिय पोळी शेकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलाय. 

बच्चू कडूंचे सोंग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय - रवी राणा

जिल्हा परिषदेच्या मैदानासाठी सुद्धा आम्ही आठ दिवसाआधीच अर्ज दिलेला होता. मात्र, तुम्ही राजकीय वापर करून ते मैदान मिळून घेतलं, असा आरोपही रवी राणा यांनी केलाय. बच्चू कडू आणि दिनेश बुब यांना रवी राणा यांच्याकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होता, असा आरोप बच्चू कडू यांनी केला होता. यावर रवी राणा यांनी म्हटलं की, 'बच्चू कडू यांचे सोंग संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले आहे. आंदोलन करून कुठेतरी मीडियात राहण्याचा बच्चू कडू यांचा नेहमीच प्रयत्न असतात. ज्या थाळी मध्ये खातो त्याच थाळीमध्ये छेद पाडण्याचा धंदा बच्चू कडू करत असतात'. बच्चू कडू यांच्यासोबत जी काही लोकशाही मार्गाने कायदेशीरदृष्ट्या लढाई करायची ती करण्यास मी तयार असल्याचा देखील यावेळी रवी राणा यांनी सांगितले. 

काय म्हणाले बच्चू कडू?

'ही निवडणूक शांततेत पार पडावी याची जबाबदारी आमची देखील आहे. मात्र, राणा दाम्पत्याचा असा प्लॅन होता की, हे प्रकरण अधिक चिघळावं आणि आमच्यावर लाठीचार्ज व्हावा, जेणेकरून आम्ही संतापात येऊन असे काही कृत्य करू ज्यातून आम्हाला अटक केली जाईल. असा आमचा कायमचा बंदोबस्त राणा दाम्पत्याकडून करण्यात आल्याचा गंभीर आरोप प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी केला होता. नवनीत राणा यांच्या म्हणण्यानुसारच येथील पोलीस यंत्रणा काम करते. त्यांचेच म्हणणे पोलीस ऐकत आहे. शिवाय एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे पोलीस यंत्रणा काम करत असल्याचेही आरोपही बच्चू कडू यांनी पोलिसांवर केलाय. प्रहारचा उमेदवार आणि बच्चू कडू यांना कशाप्रकारे अडचणीत आणता यईल आणि त्यांना कशी अटक करता येईल, याचा सुनियोजित कट राणा दाम्पत्याकडून करण्यात आल्याचा आरोपही बच्चू कडू यांनी बोलताना केला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 21 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Marathi Sahitya Sammelan : RSS मुळे माझा मराठीशी संबंध,पवारांसमोर UNCUT भाषणSharad Pawar Speech Marathi Sahitya Sammelan Delhi : आखिल भारतीय साहित्य संमेलनात शरद पवारांचे भाषणDr.Tara Bhawalkar speech Delhi:कोण पुरोगामी, कोण फुरोगामी, मोदी-पवारांसमोर तारा भवाळकरांनी सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Embed widget