एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

9th July In History: अभिनेते, दिग्दर्शक गुरुदत्त यांचा जन्म, मुंबई शेअर बाजाराची सुरुवात; आज इतिहासात

9th July In History: आजच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराची वडाच्या झाडाखाली सुरुवात झाली. आजच्या दिवशी प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा असलेली विंबल्डन चॅम्पियनशिप सुरू झाली. तर, आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीवर छाप सोडणारे गुरुदत्त यांचा जन्म झाला. 

9th July In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व असते. त्या-त्या दिवशी घडलेल्या घटना महत्त्वाच्या असतात. आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराची वडाच्या झाडाखाली सुरुवात झाली. आजच्या दिवशी प्रतिष्ठित टेनिस स्पर्धा असलेली विंबल्डन चॅम्पियनशिप सुरू झाली. तर, आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीवर छाप सोडणारे गुरुदत्त यांचा जन्म झाला. 

1875: मुंबई शेअर बाजाराची सुरुवात

व्यापारी प्रेमचंद रॉयचंद यांनी 9 जुलै 1875 साली मुंबई शेअर बाजाराची स्थापना केली. टाऊन हाॅलसमोरील वडाच्या झाडाखाली हे सर्व दलाल लोक एकत्र येऊन व्यवहार करत असे.  1980 मध्ये बीएसईचे कार्यालय पीजे टॉवर्समध्ये हलवण्यात आले. 9 जुलै, 1875 रोजी दलालांनी द नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन या नावाने कामाला सुरुवात केली. ऑगस्ट 1957 मध्ये बीएसई सिक्योरिटीज कॉन्ट्रक्टस रेग्युलेशन अॅक्टअतंरग्त भारत सरकारने मान्यता दिली. सरकारने मान्यता दिलेला हा पहिला स्टॉक एक्सचेज आहे. त्यानंतर 1986 मध्ये देशातील पहिला इक्विटी इंडेक्स, S&P BSE SENSEX, 1978-79 मध्ये सुरु झाले. त्याचा बेस पॉईंट 1000 ठेवण्यात आला होता.

वडाच्या झाडाखाली सुरू झालेल्या मुंबई शेअर बाजाराने आपल्या व्यवहाराचा वटवृक्ष वाढवला आहे. जगातील प्रमुख 10 शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा समावेश होतो. मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल सध्या 300 लाख कोटींच्या आसपास आहे. 

1877: विंबल्डन चॅम्पियनशिप सुरू झाली

द चॅम्पियनशिप्स, विंबल्डन ही टेनिस खेळामधील सर्वात जुनी व सर्वात मानाची स्पर्धा आहे. युनायटेड किंग्डममधील लंडन शहराच्या विंबल्डन ह्या उपनगरातील ऑल इंग्लंड क्लबमध्ये ही स्पर्धा 1877 सालापासुन खेळवली जात आहे. चार ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विंबल्डन ही सर्वात जुनी व अजुनही गवतापासुन बनवलेले कोर्ट (ग्रासकोर्ट) वापरणारी एकमेव स्पर्धा आहे. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी व मिश्र दुहेरी ह्या पाच प्रमुख स्पर्धा विंबल्डन दरम्यान भरवल्या जातात.

1921: रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म 

रामचंद्र काशीनाथ म्हाळगी ऊर्फ रामभाऊ म्हाळगी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि पक्षाचे विधानसभेतील पहिले आमदार होते. ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. जनता पार्टीचे खासदार म्हणून 1977 साली आणि 1980 साली ते ठाणे लोकसभा मतदार संघातून निवडून गेले होते. 

1925: अभिनेते, दिग्दर्शक गुरुदत्त यांचा जन्म

वसंत कुमार शिवशंकर पादुकोण अर्थात गुरुदत्त यांचा आज जन्मदिन. गुरुदत्त हे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते होते. गुरुदत्त यांनी आपल्या अल्पकालीन चित्रपट कारकिर्दीत स्वतंत्र छाप सोडली होती. 1950 आणि 1960 च्या दशकात प्यासा, कागज के फूल, साहिब बीबी और गुलाम आणि चौधविन का चांद यांसारखे अनेक क्लासिक चित्रपट केले. उल्लेखनीय म्हणजे, प्यासा आणि कागज के फूल यांचा टाईम मासिकाच्या 100 सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. गुरुदत्त यांच्या चित्रपट परदेशातही झळकले. तेथील प्रेक्षकांनीदेखील त्याचे कौतुक केले. 

गुरु दत्त यांना प्रभात फिल्म कंपनीने कोरिओग्राफर म्हणून नियुक्त केले होते परंतु लवकरच त्यांना अभिनेता म्हणून काम करण्यास भाग पाडले गेले. इतकंच नाही तर सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्यांची निवड करण्यात आली. प्रभातमध्ये काम करत असताना त्याचे देव आनंद आणि रहमान यांच्याशी संबंध निर्माण झाले, ते दोघेही नंतर चांगले स्टार बनले. या दोघांच्या मैत्रीमुळे गुरू दत्त यांना फिल्मी दुनियेत स्थान निर्माण करण्यात खूप मदत झाली. प्रभात बंद पडल्यावर गुरुदत्त मुंबईत आले. देव आनंद यांनी गुरुदत्त यांना बाजी या आपल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी दिली होती. 1951 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट फ्लॉप ठरला. त्यानंतर मात्र, गुरुदत्त यांना चित्रपटसृष्टीत यश मिळाले. 

इतर महत्त्वाच्या घटना: 

1819 : साली शिलाई मशीनचा शोध लावणारे अमेरिकन संशोधक एलिआस हॉवे (Elias Howe) यांचा जन्मदिन.
1856: इटालियन रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो यांचे निधन.
1900 : साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी आणि माजी संसदीय कार्यमंत्री तसचं, मध्यप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल सत्य नारायण सिन्हा यांचा जन्मदिन.
1951 : भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
1969: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.
2011: सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis Will Be New CM : 5 तारखेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार- पीटीआयBharat Gogawale News : सत्तेच्या बाहेर राहून शिंदेंचा काम करण्याचा मानस होता- भरत गोगावलेAsaduddin Owaisi Malegaon Speech : मोहन भागवत साहब आप कब शादी कर रहे हो? ओवैसींचं स्फोटक भाषणSpecial Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammed Siraj : DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? बीसीसीआयलाही मोजावी लागते मोठी रक्कम
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
देशातील जनता कर्जाच्या विळख्यात, 1 लाख लोकांमागे 18 हजाराहून अधिक लोक कर्जबाजारी, ग्रामीण भागात प्रमाण जास्त
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
...तर आम्ही मनसेला सोबत घ्यायला तयार आहोत; राज ठाकरेंना मविआच्या जयंत पाटलांकडून ऑफर
Sanjay Gaikwad : मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
मताधिक्य घटल्याने शिवसेनेत वादाची ठिणगी! आमच्याच पक्षाच्या गद्दारांनी विरोधकांना मदत केली, संजय गायकवाडांचा आरोप 
Rohit Sharma : रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
रोहित शर्माच्या कामगिरीमुळे संघाची चिंता वाढली! दुसऱ्या कसोटीत टीम मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
2029 ची विधानसभा जिंकायच्या तयारीला लागा; चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याने उंचावल्या भुवया
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
मोठी बातमी! देशाच्या तिजोरीत मोठी भर, महिनाभरात GST संकलन 1.82 लाख कोटींवर 
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
ज्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच आत्तापर्यंत गृहमंत्रीपद आहे; अमोल मिटकरींचा दावा, शिवसेनेला चिमटा
Embed widget