अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रवादी पडेल ते काम करेल, खंद्या समर्थकाने कंबर कसली!
अजित पवारांनी 2024 ला मुख्यमंत्री व्हावं हा आमचा संकल्प आहे, राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी वक्तव्य केले आहे.
नागपूर: अजित पवार (Ajit Pawar) या गटासह महाराष्ट्राच्या सत्तेत सहभागी झाले. सहा महिन्यांपासून अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत. तर त्यांच्या गटातील आठ आमदार मंत्री झाले आहेत. अजित पवार महायुतीत (Mahayuti) गेल्यापासून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा दावा सातत्याने वेगवेगळ्या पक्षातील किंवा त्यांच्याच नेत्यांकडून केला जात आहे. अजित पवारांनी विरोधी पक्षांमधील नेते असो अथवा अजित पवारांचे समर्थक, अनेकांनी अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील असा दावा केला आहे.एवढच नाही तर त्यांचे बॅनर देखील लागले होते. आता चर्चांना राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) वक्तव्यामुळे पुन्हा उधाण आले आहे.
दरम्यान, अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि आमदार अमोल मिटकरी यांनी यावर भाष्य केलं आहे.अमोल मिटकरी यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मिटकरी म्हणाले, 2024 चा संकल्प एवढाच की, राज्याचे मुख्यमंत्री हे अजित पवार व्हावे आणि त्यासाठी राष्ट्रवादी पडेल ते काम करेल.
ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण देणार
अजित पवार गट रेशीमबागेत जाणार नाही याविषयी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले, स्वता:च्या पक्षाने कुठे जावे हा त्यांचा अधिकार आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या चळवळीतले आम्ही आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण दिलं जाणार आहे.
अधिवेशन पूर्ण वेळ चालवण्यात यावे, मिटकरींची मागणी
हिवाळी अधिवेशन विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्या, युवकांची बेरोजगारी, उद्योगधंद्यांच्या बाबतीत असलेला मागासलेपणा या सर्व बाबींवर चर्चा व्हावी. त्यासाठी अधिवेशन पूर्ण वेळ चालवण्यात यावे आणि विदर्भाच्या प्रश्नांवर प्राधान्य देण्यात यावे, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय.
महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलै रोजी मोठा भूकंप
महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलै रोजी मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतील 40 हून अधिक आमदारांना आपल्याबरोबर घेऊन अजित पवार यांनी वेगळा गट बनवला. या गटासह त्यांनी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला. महाराष्ट्राच्या राजकारण (Maharashtra Politics) आलेल्या अस्थिरतेमुळे रोज वेगवेगळ्या चर्चा होत असतात. अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी झाल्यापासून शिवसेनेत नाराजी असल्याची चर्चा होतेय.
हे ही वाचा :
मराठवाड्यातील मराठा समाजाची फसवणूक, 95 टक्के मराठे आरक्षणाच्या बाहेर राहणार; बाळासाहेब सराटेंचा आरोप