एक्स्प्लोर

Jayant Patil : जयंत पाटील लवकरच अजितदादांसोबत असतील, योग्य वेळी निर्णय घेतील: अमोल मिटकरी

Amol Mitkari On Jayant Patil : तुमच्याकडे बारीक लक्ष देऊन काय उपयोग, तुम्ही काही प्रतिसाद देत नाही असा मिश्किल टोला अजितदादांनी जयंत पाटलांना लगावला होता. 

मुंबई : शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील लवकरच अजितदादांच्या राष्ट्रवादीत असतील असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला. जयंत पाटलासाठी हीच ती योग्य वेळ, आता राम कृष्ण हरी चला एकत्र जाऊ देवगीरी असंही अमोल मिटकरी म्हणाले. सभागृहात बोलताना जयंत पाटलांनी योग्य वेळी योग्य निर्णय असा नियम असल्याचं म्हटलं होतं. त्यावर अमोल मिटकरी यांनी जयंत पाटील आता राष्ट्रवादीत येतील असा दावा केला आहे. 

राज्याच्या विशेष अधिवेशनामध्ये शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी बोलताना 'दादा, आपल्या पक्षाचा एक नियम आहे योग्य वेळी योग्य निर्णय' असं वक्तव्य केलं होतं. त्यावर जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला. 

जयंत पाटील योग्य निर्णय घेतील

अमोल मिटकरी म्हणाले की, "जयंत पाटील म्हणाले योग्य वेळी योग्य निर्णय घेणार. मधली ओळ अशी आहे की लवकरच अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत ते असतील. शरद पवार साहेबांचं आवडीचं गाणं आहे 'तुम इतना क्यू मूस्करा रहा हो'. त्यानुसार मे इतना मुसकरा रहा हू दिल मे खुशी छुपा रहा हू. जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेत आहेत." 

गेल्या वेळच्या महायुतीच्या सरकारच्या 10 कॅबिनेट बैठका झाल्या होत्या. त्याचवेळी अजित पवारांनी जयंत पाटलांना बोलावलं होतं. जयंत पाटील त्यावेळी हसले होते असंही अमोल मिटकरी म्हणाले. 

अजितदादा-जयंत पाटलांमध्ये टोलेबाजी

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा मिश्किल संवाद विधानसभेत बघायला मिळाला. बघा किती बारीक लक्ष आहे असं जयंत पाटील अजितदादांना उद्देशून म्हणाले. तर बारीक लक्ष देऊन काय फायदा? तुम्ही प्रतिसाद देत नाही असा मिश्किल टोला अजित पवारांनी लगावला. दोन्ही नेत्यांच्या या मिश्किल वक्तव्यानं वपिधिमंडळात एकच हशा पिकला.

अजितदादांचा विरोधकांवर हल्लाबोल

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतरच्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शपथविधीवर बहिष्कार घालणाऱ्या विरोधकांवर अजित पवारांनी टीकास्त्र डागलं. तर जयंत पाटलांकडे बघून विधानसभा निवडणुकीत आपला करेक्ट कार्यक्रम झाल्याचं मान्य करा असंही म्हणाले. ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन किती दिवस रडीचा डाव खेळणार असा सवालही त्यांनी विचारला.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : पंकजा मुंडे पुन्हा म्हणाल्या, सुरेश धस यांना समज द्या, कारणही सांगितलं
मोठी बातमी : पंकजा मुंडे पुन्हा म्हणाल्या, सुरेश धस यांना समज द्या, कारणही सांगितलं
अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला  
अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला
Satish Bhosale: सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satish Bhosale Arrested: Suresh Dhasयांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटकPankaja Munde On Suresh Dhas : पक्षश्रेष्ठींनी आमदार धस यांना समज द्यावी : पंकजा मुंडेAjit Pawar Tribute Yashwantrao Chavan : अजित पवारांची प्रितीसंगमावर यशवंतराव चव्हाणांना आदरांजलीAjit Pawar PC Pritisangam : सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असावा याची शिकवणी चव्हाण साहेबांनी दिली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : पंकजा मुंडे पुन्हा म्हणाल्या, सुरेश धस यांना समज द्या, कारणही सांगितलं
मोठी बातमी : पंकजा मुंडे पुन्हा म्हणाल्या, सुरेश धस यांना समज द्या, कारणही सांगितलं
अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला  
अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला
Satish Bhosale: सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक होताच सुरेश धस लगेच कॅमेऱ्यांसमोर आले अन् म्हणाले....
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये? स्थानिकांच्या दाव्याने खळबळ, पोलिसांकडून कसून शोध
कर बचतीसाठी सोप्या टिप्स!
कर बचतीसाठी सोप्या टिप्स!
Nashik Godavari : एकीकडे गोदामाईचा श्वास गुदमरतोय अन् दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब दावा; म्हणाले, गोदावरी प्रदूषित नाहीच!
एकीकडे गोदामाईचा श्वास गुदमरतोय अन् दुसरीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजब दावा; म्हणाले, गोदावरी प्रदूषित नाहीच!
कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे असूनही अर्थसंकल्पात भोपळा, पण साखरसम्राटांच्या कारखान्यांसाठी 'पेटारा' उघडला!
कोल्हापूर जिल्ह्यात 10 पैकी 10 आमदार महायुतीचे असूनही अर्थसंकल्पात भोपळा, पण साखरसम्राटांच्या कारखान्यांसाठी 'पेटारा' उघडला!
जीवाचा प्रश्न म्हणत भाजप आमदाराची बनावट पनीर घेत थेट विधीमंडळात एन्ट्री, 'लक्षवेधी'तून ठेवणार अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर बोट
जीवाचा प्रश्न म्हणत भाजप आमदाराची बनावट पनीर घेत थेट विधीमंडळात एन्ट्री, 'लक्षवेधी'तून ठेवणार अन्न व औषध प्रशासनाच्या कारभारावर बोट
Embed widget