गेल्या दीड महिन्यांपासून आई बारामतीतच, मग आताच भेट का? दादा-ताईंच्या भेटीवर मिटकरींचा सवाल
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे मतदान सुरु असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरी दाखल झाल्या. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या आईंची भेट घेतली.
Amol Mitkari : महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तिसऱ्या टप्प्याचे आज मतदान पार पडत आहे. यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Constituency) मोठा ट्विस्ट पहायला मिळाला. शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) या थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या काटेवाडी येथील घरी दाखल झाल्या आणि अजित पवार यांच्या आई आशा पवार (Asha Pawar) भेट घेतली. या भेटीवर आता राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार (Supriya Sule vs Sunetra Pawar) अशी लढत होत आहे. बारामतीत पहिल्यांदाच पवार कुटुंबीय एकमेकांविरोधात निवडणुकीत उभे राहिल्याने या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. आज सकाळी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?
यावर अमोल मिटकरी यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यात म्हटले आहे की, खा.सुप्रियाताई आत्ताच दादांच्या आई म्हणजे आशाताई पवार यांना काटेवाडी या त्यांच्या गावी भेटायला गेल्याची बातमी प्रसार माध्यमांद्वारे कळली. निवडणुकीच्या (Election 2024) रणधुमाळीत गेल्या दीड महिन्यापासून आशाताई बारामती (Baramati) परिसरातच आहेत. मतदारांमध्ये (Voters) संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.
आशा काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी आले - सुप्रिया सुळे
दरम्यान, सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या काटेवाडीमधील घरी जाऊन अजित पवारांच्या आई आशा पवार यांची भेट घेतली. यावेळी घरी अजित पवार आणि सुनेत्रा पवार नव्हत्या. काकींना भेटण्यासाठी आपण आलो होतो. आशा काकींना भेटायला आली होती, त्यांचा आशिर्वाद घ्यायला आली होती, असे त्यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sanjay Raut: मला सुनेत्रा पवारांची दया येते, अजितदादांनी एका गृहिणीला बळीचा बकरा बनवलंय: संजय राऊत