एक्स्प्लोर
Advertisement
महानायकाची प्रकल्पाला आर्थिक मदत, प्रकाश आमटेंची फेसबुक पोस्ट
सोनी टीव्हीवरील 'कौन बनेगा करोडपती' या गेम शोमध्ये खेळून डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी 25 लाख रुपये जिंकले.
मुंबई : 'कौन बनेगा करोडपती'च्या दहाव्या सीझनमधील 'केबीसी-कर्मवीर' या विशेष भागात ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे सहभागी झाले होते. या एपिसोडनंतर कार्यक्रमाचे यजमान आणि महानायक अमिताभ बच्चन यांनी लोक बिरादरी प्रकल्पाच्या माध्यामातून केल्या जाणाऱ्या कामासाठी 25 लाख रुपयांची देणगी दिली आहे. स्वत: डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी फेसबुकवर याची माहिती दिली आहे.
सोनी टीव्हीवरील 'कौन बनेगा करोडपती' या गेम शोमध्ये खेळून डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी 25 लाख रुपये जिंकले. 7 सप्टेंबर रोजी हा भाग प्रसारित झाला होता. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे पहिल्यांदाच केबीसीच्या हॉटसीटवर बसले.
हा कार्यक्रम झाल्यावर अमिताभ बच्चन यांनी स्वत:कडील 25 लाखांची देणगी प्रकल्पासाठी देत असल्याचं सांगितलं. महारोगी सेवा वरोराद्वारे चालवण्या जाणाऱ्या लोक बिरादरी प्रकल्पाच्या खात्यात जमा केले. स्वत:च्या देणगीचा उल्लेख त्यांनी केबीसीच्या कार्यक्रमात जाहीर केला नाह. आम्ही याबाबत त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोक बिरादरी प्रकल्पाचे काम महाराष्ट्राबाहेर पोहोचलं, असं प्रकाश आमटे यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
प्रकाश आमटे यांची फेसबुक पोस्ट
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
निवडणूक
नागपूर
निवडणूक
Advertisement