31 मार्च 2026 पर्यंत देशाच्या भूमीवरून नक्षलवाद समाप्त करु, नांदेडमध्ये अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास
31 मार्च 2026 पर्यंत देशाच्या भूमीवरून नक्षलवाद समाप्त करु असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाची नांदेड येथील 'शंखनाद' भव्य जाहीर पाडली यावेळी शाह बोलत होते.

Amit Shah : 22 एप्रिलला पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी आपल्या निर्दोष पर्यटकांवर धर्म विचारून मारण्याचे कृत्य केलं. आहे. यावेळी पंतप्रधानांनी पटनामध्ये सांगितलं होतं की अतिरेक्यांना शोधून तुम्हाला मारलं जाईल. ऑपरेशन सिंदूरमध्ये शेकडो अतिरेकऱ्यांना मारले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मेसेज गेला की भारताची सेना, भारताची जनता आणि भारताची सीमा याला छेडछाड करणाऱ्याला सोडले जाणार नाही असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी व्यक्त केले. 31 मार्च 2026 पर्यंत देशाच्या भूमीवरून नक्षलवाद समाप्त करु असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाची नांदेड येथील 'शंखनाद' भव्य जाहीर पाडली यावेळी शाह बोलत होते.
गोली का जवाब गोले से दिया जायेगा
गोली का जवाब गोले से दिया जायेगा. पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टिम खोकली असल्याचं आपण दाखवून दिल्याचे शाह म्हणाले. आमच्या आया बहिणींच्या माथ्यावरील सिंदूर स्वस्त नाही हे मोदीजींनी दाखवून दिले आहे. आपल्याला असा भारत बनवायचा आहे की, ज्याच्यासमोर कोणी डोळे वर करून बघणार नाही असे शाह म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर नंतर मोदींनी सर्व खासदारांना बोलून पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पर्दाफाश करण्याचं काम करावे असे सांगितले होते. तेव्हा उद्धव ठाकरे सेनेच्या एका प्रमुख नेत्याने सांगितले की किसकी बारात जा रही है असं म्हटलं होतं. उद्धव सेनेच्या लोकांना काय झाले माहिती नाही असे शाह म्हणाले. शरद पवार अनेक वर्षे केंद्रीय मंत्रिमंडळात राहिले. एकदाही काही केलं नाही, मोदीजींनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचे अमित शाह म्हणाले. भारताला विकसित राष्ट्र बनवण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या महाराष्ट्र भूमीचे मोठे योगदान असेल असेही शाह म्हणाले.



















