एक्स्प्लोर

आमची 51 टक्के मतांची तयारी झालीय, ठाकरेंच्या युतीवर भाजपचे प्रत्त्युत्तर; बावनकुळेंनी सांगितलं निवडणुकांचं गणित

भाजप महायुतीने 51 टक्के मतदानाची तयारी केली आहे. विधानसभेत सुद्धा आम्हाला 51.78 टक्के मतं मिळाली आहेत.

मुंबई : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले असून रणनीती आखण्यासही सुरुवात झाली आहे. मुंबई महापालिका (BMC) काहीही करुन आपल्या ताब्यात घेण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली असली तर, ठाकरेंच्या ताब्यातून बीएमसी जाऊ न देण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाचा आहे. त्यामुळेच, मुंबईत शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. त्यातच, मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मुंबईत पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांना हेवेदावे विसरुन वाद न करण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय. आता, राज ठाकरेंच्या भाषणानंतर भाजपने (BJP) प्रतिक्रिया देत आम्ही 51 टक्के मतदानाची तयारी केल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. 

भाजप महायुतीने 51 टक्के मतदानाची तयारी केली आहे. विधानसभेत सुद्धा आम्हाला 51.78 टक्के मतं मिळाली आहेत. राज ठाकरे आणि त्यांच्या मित्र पक्षांनी काय तयारी केली ती मला माहिती नाही. पण, आमची तयारी झाली आहे. कोणीही आलं आणि लढलं तरीही 51% मत महायुती घेणार आहे, असा प्रबळ विश्वासच भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखवला. यावेळी,  एकही जागा काँग्रेस किंवा शरद पवार आणि ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार नाही. कारण जनतेने स्वीकारला आहे की, नरेंद्र मोदी हे देशाला समृद्ध करत आहेत. तर देवेंद्र फडणवीस ते महाराष्ट्राला विकसित करत आहेत. त्यामुळे, जनता विकासासोबत जाणार आहे, असा विश्वास बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत व्यक्त केला आहे. 

ठाकरे बंधुंच्या युतीसंदर्भातील प्रश्नावरही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं. ज्यांची निवडणूक लढविण्याची तयारी नाही, ते लोक असे विधान करतात. आम्ही उद्या निवडणुका लागल्या तरीही तयार आहोत. महाराष्ट्रात 1 कोटी 51 लाख सदस्य असणारा भाजप, अजित पवार आणि एकनाथ शिंदे तयार आहेत. ते काय करणार हे माहित नाही, मात्र आमची तयारी पक्की आहे असेही बावनकुळे यांनी म्हटलं. 

लालूच देऊन भडकावत असतील - पेडणेकर

राज ठाकरे यांनी त्यांच्या हिमतीवर पक्ष स्थापन केला, चोरून पक्ष स्थापन केला नाही. राज ठाकरे सत्तेत नव्हते तरीपण त्यांच्यासोबत मनसैनिक आहेत. शिवसेना देखील जास्त वेळ सत्तेत नव्हती तरी पण शिवसैनिक सोबत आहेत. राज ठाकरे यांना वाटलं असेल की काही पदाधिकाऱ्यांना लालूच देऊन भडकवताहेत. म्हणून, राज ठाकरे यांनी म्हटलं असेल की हेवेदावे सोडा, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेत्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. 

हेही वाचा

राज ठाकरेंविरुद्ध सर्वाच्च न्यायालयात धाव, कोर्टाच्या आदेशानंतर काढून घेतली जनहित याचिका

 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Bajrang Sonawane : माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
माझ्या मुलाचा हात असेल तर स्वतः पोलीस ठाण्यात घेऊन येतो; खा. बजरंग सोनवणेंची भूमिका, पोलीस महासंचालकांच्या निर्णयावर शंका
Bharati Pawar : आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल, राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड होताच भारती पवार यांची पहिली प्रतिक्रिया
आता नव्या उमेदीनं काम करता येईल, युवकांच्या प्रश्नांसाठी मोठा आग्रह असेल : भारती पवार

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget