एक्स्प्लोर

Ambadas Danve : शिवसेना कुणीतरी फोडली याची खंत, दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात ही आशा; अंबादास दानवे यांचे मोठं वक्तव्य

Ambadas Danve On Majha Katta : आमची एवढी मजबूत संघटना कुणीतरी फोडली याची सल कायमच मनाल लागली, तीच ताकद पुन्हा एकत्रित राज्याला दिसली पाहिजे अशी अशा ठेवायला काय हरकत आहे असं अंबादास दानवे म्हणाले.

मुंबई : नुकतंच पार पडलेल्या अधिवेशनात ठाकरे आणि शिंदे गटातला टोकाचा संघर्ष पाहायला मिळाला. फोटोसेशनमध्ये उद्धव ठाकरेंच्या एन्ट्रीमुळे वैतागलेले एकनाथ शिंदे पाहायला मिळाले. एकीकडे असं असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरेंचे शिलेदार अंबादास दानवे यांनी माझा कट्टा या कार्यक्रमात एक मोठं वक्तव्य केलं आहे. शिवसेना फुटली याची खंत असून दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अशी आपली इच्छा असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

शिवसेना म्हणून आपण एकत्र असलं पाहिजे, शिवसेनेची एकत्रित ताकद राज्याला दिसली पाहिजे असं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं. एकीकडे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे दोन्ही शिवसेना एकत्रित याव्यात अशी अपेक्षा अंबादास दानवे यांनी केली.

Ambadas Danve On Majha Katta : आमची संघटना कुणीतरी फोडली याची सल

दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात का असा प्रश्न अंबादास दानवे यांना विचारला. त्यावर दानवे म्हणाले की, शिवसेना फुटली त्यावेळी मनाला वेदना झाल्या. आम्ही काही सत्तेसाठी जन्मलो नाही. आमची संघटना फुटली. मनाला झालेली ही वेदना कधी ना कधी भरुन यावी ही अपेक्षा आहे.

अंबादास दानवे म्हणाले की, "आमची एवढी मजबूत संघटना फुटली, ती कुणीतरी फोडली याची मनाला कायम सल राहिली. आता शिवसेना म्हणून एकत्रित ताकद राज्याला दिसली पाहिजे. तशी आशा ठेवायला काय हरकत आहे?"

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांचे हे शेवटचे अधिवेशन होते. विरोधी पक्षनेते म्हणून ऑगस्टपर्यंत त्यांचा कार्यकाल आहे. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहणं पसंत केलं होतं. आता शिवसेनेच्या फुटीवर त्यांनी खंत व्यक्त केली. त्याचवेळी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. 

अंबादास दानवे यांच्या कामाचे कौतुक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांनी उल्लेखनीय काम केलं अशी स्तुती सत्ताधारी तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. अंबादास दानवे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले नसले तरी त्यांनी कधीही भरलेल्या ताटाशी प्रतारणा केली नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंनाही टोला लगावला. अंबादास दानवे यांनी पुन्हा यावं, पण याच पक्षातून यावं असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

विधिमंडळात गाजलेल्या सातारा झेडपी अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; कुणबी प्रमाणपत्र बेकायदेशीर, घाईघाईत बनवलं, याचिका दाखल
विधिमंडळात गाजलेल्या सातारा झेडपी अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; कुणबी प्रमाणपत्र बेकायदेशीर, घाईघाईत बनवलं, याचिका दाखल
नामांकित IT कंपनीत महिलांवर अत्याचार, 6 आरोपींना अटक, नाशिकमध्ये पुन्हा धक्कादायक घटना
नामांकित IT कंपनीत महिलांवर अत्याचार, 6 आरोपींना अटक, नाशिकमध्ये पुन्हा धक्कादायक घटना
Purandar News : धैर्याने समोर आली, शांतपणे विधी केला! लेकीनेच पार पाडला वडिलांचा अंत्यविधी, कर्नलवाडीतील घटनेतून समाजाला नवा संदेश
धैर्याने समोर आली, शांतपणे विधी केला! लेकीनेच पार पाडला वडिलांचा अंत्यविधी, कर्नलवाडीतील घटनेतून समाजाला नवा संदेश
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, दिव्यांग बांधवांचा धडक मोर्चा; कार्यालयाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त

व्हिडीओ

Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story
Rahuri Election: राहुरीत ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्याची अपक्ष उमेदवारी; रावसाहेब खेवरेंचा भाजपवर हल्ला
Sanjay Savkare Nandurbar : सुनेत्रा पवार बारामतीतून निवडून येणार- संजय सावकारे
Ashok Kharat On Nashik Court : अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात मिळाली न्यायालयीन कोठडी
Samarjeet Ghatge Join BJP : फडणवीस थोरल्या भावासारखे, भाजपात जाताच समरजीत घाटगेंकडून कौतुक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold : अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
अमेरिका- इराणमधील संघर्ष दोन आठवड्यांसाठी थांबताच सोनं महागलं, लग्नसराईत सोन्याचे दर कमी होणार? पुण्यातील सोन्याचे व्यापारी म्हणतात...
विधिमंडळात गाजलेल्या सातारा झेडपी अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; कुणबी प्रमाणपत्र बेकायदेशीर, घाईघाईत बनवलं, याचिका दाखल
विधिमंडळात गाजलेल्या सातारा झेडपी अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; कुणबी प्रमाणपत्र बेकायदेशीर, घाईघाईत बनवलं, याचिका दाखल
गणपतीपुळेच्या समुद्रात LED मासेमारी, मध्यरात्री नौकात उतरले अधिकारी; ऑपरेशन क्लीन-सी मोहीमेत 3 बोटी जप्त
गणपतीपुळेच्या समुद्रात LED मासेमारी, मध्यरात्री नौकात उतरले अधिकारी; ऑपरेशन क्लीन-सी मोहीमेत 3 बोटी जप्त
Share Market :  सेन्सेक्स आणि निफ्टीचं जोरदार कमबॅक, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, एका दिवसात 17 लाख कोटींची कमाई  
सेन्सेक्स आणि निफ्टीचं जोरदार कमबॅक, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, एका दिवसात 17 लाख कोटींची कमाई  
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला चोपला
संतापजनक! सेवानिवृत्तीस आलेल्या शिक्षकाकडून तिसरीतील विद्यार्थिनीवर अत्याचार; संतप्त ग्रामस्थांनी मास्तरला चोपला
शिकाऱ्याचीच 'शिकार' झाली? 'निशस्त्र' गाझा संपवल्यानंतर आता लेबनाॅन, इराणला संपवण्याचा नादात ट्रम्पनंतर नेत्यानाहूंची राजकीय अन् लष्करी कोंडी!
शिकाऱ्याचीच 'शिकार' झाली? 'निशस्त्र' गाझा संपवल्यानंतर आता लेबनाॅन, इराणला संपवण्याचा नादात ट्रम्पनंतर नेत्यानाहूंची राजकीय अन् लष्करी कोंडी!
US-Iran War Ceasefire : ईराण-अमेरिका युद्धविरामात पाकिस्तान नाही, चीन खरा खेळाडू? नेमकं काय घडलं?
ईराण-अमेरिका युद्धविरामात पाकिस्तान नाही, चीन खरा खेळाडू? नेमकं काय घडलं?

Embed widget