एक्स्प्लोर

Raj Thackeray : चिथावणी देण्याचा कोणताही पुरावा नाही; राज ठाकरेंविरोधातील 2008 मधील खटला रद्दबातल

उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद खंडपीठात 16 वर्षे जुन्या खटल्यातील दोषमुक्तीचा अर्ज फेटाळणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ठाकरे यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती.

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Navnirman Sena (MNS) leader Raj Thackeray) यांच्या कथित चिथावणीखोर भाषण (Provocative Speech) आणि चिथावणी देण्याबाबत कोणताही पुरावा नसल्याचे निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने केस रद्द केली आहे.  

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Mumbai High Court) औरंगाबाद खंडपीठात 16 वर्षे जुन्या खटल्यातील दोषमुक्तीचा अर्ज फेटाळणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या ठाकरे यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. काही महत्त्वाच्या बाबी समजून घेण्यात कनिष्ठ न्यायालय अयशस्वी ठरले आहे, ठाकरे यांनी डिस्चार्जसाठी केलेली विनंती नाकारण्यात चूक केली आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

पक्षाच्या कार्यकर्त्यांना भडकवल्याप्रकरणी गुन्हे दाखल

हे प्रकरण 21 ऑक्टोबर 2008 चा आहे. ज्यामध्ये तत्कालीन उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यात मनसे कार्यकर्त्यांवर एसटी बसेसवर दगडफेक केल्याचा आरोप करण्यात आला होता. राज ठाकरे 2008 मध्ये, बिहार आणि उत्तर प्रदेशातील परप्रांतीय कामगारांनी महाराष्ट्रातील लोकांच्या नोकऱ्या हिरावल्याचा आरोप केला होता. मुंबईत रेल्वे प्रवेश परीक्षेला बसलेल्या काही उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना भडकवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. ठाकरे यांची लवकरच सुटका झाली होती. तथापि, राज्यभरात त्यांच्या सुटकेसाठी हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या होत्या. अशाच एका घटनेत त्यांच्यावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला होता.

तपासाअंती, या प्रकरणात आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणात आरोपी क्रमांक 6 म्हणून अटक करण्यात आलेल्या ठाकरे यांनी दोषमुक्तीसाठी याचिका दाखल केली होती. मात्र, ट्रायल कोर्टाने तो फेटाळली होती. 

राज यांची बाजू मांडणारे वकील राजेंद्र शिरोडकर आणि सयाजी नांगरे यांनी ही कथित घटना घडली तेव्हा मनसे नेते तुरुंगात होते आणि घटनास्थळी नव्हते, अशी भूमिका मांडली. ठाकरे यांचे कथित प्रक्षोभक भाषण फिर्यादीने रेकॉर्डवर ठेवलेले नाही आणि आरोपपत्रात देखील जोडलेले नाही, त्या अनुपस्थितीत त्यांनी प्रक्षोभक भाषण केले असे म्हणता येणार नाही, असेही वकिलांनी न्यायालयाच्या निर्दशनास आणून दिले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attcked Update : सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांकडून 35 पथकांची स्थापना, 20 लोकल तर 15 क्राईम ब्रांच पोलिसांची पथकंSaif Ali Khan Doctors : फक्त 2MM ने वाचला ⁠सैफ अली खान! हल्ल्याबाबत डॉक्टरांनी काय सांगितलं?ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 4 PM 17 January 2025Dhananjay Deshmukh : ...म्हणून मी आज जबाब नोंदवणार नाही, धनंजय देशमुखांनी स्वतः सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाच्या बेड्या; खासदारसोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
लग्न करायचं असेल तर ठीकय, पण..; प्रणिती शिंदेंकडून खंत; म्हणाल्या, मला आज आपल्या देशाचं वाईट वाटतंय
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
आयशरच्या धडकेत 15 जण बसलेली वडाप टॅक्सी 20 फुट हवेत उडाली अन् पुढे उभ्या एसटीवर आदळली; सीटाही बाहेर फेकल्या, प्रत्यक्षदर्शीने सांगितली भयावह कहाणी
Santosh Deshmukh Case : CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
CM फडणवीस-उज्ज्वल निकमांच्या भेटीनंतर संतोष देशमुखांच्या भावाचं मोठं वक्तव्य; म्हणाले, लवकरच त्यांची...
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
नांदेडचा बीड करायचा नाही, मुंडे बंधु-भगिनींना जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नको; सकल मराठा समन्वयकाचा इशारा
Khel Ratna And Arjuna Awards : मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
मनु भाकर, डी गुकेशसह चार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित, स्वप्निल कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ahilyanagar Crime :  नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
नऊ वर्षीय चिमुकलीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याचा हल्ला; वडिलांच्या डोळ्यादेखत चिमुरडीचा अंत
Embed widget