बीडमध्ये भुखंडाच्या बेटरमेंट चार्जवरून क्षीरसागर काका पुतण्यात आरोप -प्रत्यारोप
भूखंड विक्रीसाठीच्या बेटरमेंट चार्ज वरून काका-पुतण्या मध्ये जुंपली आहे. पन्नास लाखांपेक्षा जास्त रुपयांचा बेटरमेंट चार्ज भरला नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.
बीड : बीडमध्ये क्षीरसागर काका पुतण्यातील संघर्ष हा कायम या ना त्या कारणाने समोर येत असतो आता पुन्हा एकदा भूखंड विक्रीसाठीच्या बेटरमेंट चार्ज वरून काका-पुतण्या मध्ये जुंपली आहे. शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या नावे असलेल्या भूखंड विक्रीसाठी नगरपालिकेत पन्नास लाखांपेक्षा जास्त रुपयांचा बेटरमेंट चार्ज भरला नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे.
यासंदर्भात तक्रार संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या जिल्हाधिकारी राहुल यांनी रेखावार यांच्याकडे केली होती..या तक्रारीमध्ये संदीप क्षीरसागर यांनी म्हटले आहे की, जयदत्त क्षीरसागर यांच्या मालकीच्या सर्वे क्रमांक आठ व नऊ तरफ खोड मळ्यामधील भुखंडाचे क्षेत्रफळ आठ लाख 75 हजार 563 चौरस फुट आहे. सदर क्षेत्राची खरेदी - विक्री करण्यासाठीचा बेटरमेंट चार्ज 50 लाखांपेक्षा जास्त आहे. मात्र, त्यांनी याबाबत पालिकेला मागीतलेल्या सवलतीच्या शपथपत्रावर या पूर्वीच्या नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांनी कुठलीही कार्यवाही केले नसताना सदर शुल्क पालिकेत भरले नसल्याचे आरोप संदीप क्षीरसागर यांनी केलेला आहे
या प्रकरणाची तक्रार संदीप क्षीरसागर यांनी बीडच्या जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी या संदर्भामध्ये सुनावणी घेतली. 29 सप्टेंबरच्या सुनावणीत पालिकेच्या जनरलाईज ठरावात मान्यता देण्यात आली. परंतु या ठरावाचे कन्फरर्मेशन नगरपालिकेत सादर नसल्याचे किंवा मागणी प्रमाणे मान्यता देणारे कुठलेही पत्र उपलब्ध नसल्याचे या उघड झाल्याचे संदीप क्षीरसागर यांचे म्हणणे आहे
केवळ प्रसिध्दीसाठी खोटे आरोप : डॉ. भारतभूषण क्षीरसागर
संदीप क्षीरसागर यांच्या तक्रारीनंतर जयदत्त क्षीरसागर यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालाचा चुकीचा अर्थ लावून दिशाभूल करत असल्याचा प्रत्यारोप जयदत्त क्षीरसागर यांनी केलाय केवळ प्रसिद्धीसाठी हे खोटे आरोप केला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
शासनाच्या परिपत्रकानुसार ले आऊट मंजूर झाल्यानंतर सदर प्लॉटचे संबंधीत खरेदीदाराकडून बेटरमेंट चार्ज वसूल करणे बाबतचा ठराव सर्वानुमते मंजूर झाल्यानंतरच जयदत्त क्षीरसागर यांनी सदर लेआऊटमधील 42 भूखंड विक्री केल्याचेही म्हटले आहे. नगरपालिकेने 11 लाख 11 हजार 895 रुपये बेटरमेंट चार्जेसपोटी वसूल केले असून त्याचा उल्लेख अहवालात आहे. लेआऊट मधील भूखंड विक्रीबाबत कोणतीही अनियमितता झाली नसल्याचे त्यांचे अहवालात आहे तसेच विकसन फिस पोटी रूपये 3150 जमा केल्याची पावती देखील अहवालासोबत दाखल आहे. अहवालाचा चुकीचा अर्थ लावून जेवढे पैसे खाल्ले तेवढे वापस घेणारच असे सांगून बीडकरांची सहानुभूती मिळवण्याचा केवीलवाणा प्रयत्न आमदारांकडून केला जात असल्याचा आरोपही नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी केला.