एक्स्प्लोर
Advertisement
पुण्याचा 'कचरा', सांस्कृतिक राजधानीची 'कोंडी'
पुणे: महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी गेल्या 18 दिवसांपासून कचऱ्यात आहे. पुणे शहरातील कचराकोंडी 18 दिवसांपासून कायम आहे.
शहर कचऱ्यात असताना शहराचे प्रथम नागरिक अर्थात महापौर मुक्ता टिळक, महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि पालकमंत्री गिरीष बापट हे परदेश दौऱ्यावर आहेत.
काय आहे पुण्याचा कचरा प्रश्न?
पुण्यातील कचरा फुरसुंगी-उरळी या गावाजवळच्या कचरा डेपोत टाकला जातो. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीच्या कचरा डेपोला आग लागली होती. ही आग अनेक दिवस धुमसत असल्यानं फुरसुंगीकरांना जगणं मुश्कील झालं होतं. त्यामुळे त्यांनी फुरसुंगीकरांनी पुणे शहरातील कचरा टाकण्यास जोरदार विरोध केला आहे.
इतकंच नाही तर कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी आंदोलनही सुरु आहेत. 14 एप्रिलपासून फुरसुंगीकरांनी आंदोलन सुरु केलं आहे.
महापौर मुक्ता टिळक यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली, मात्र गावकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
पुणे शहरातून दिवसाला जवळपास 1700 मेट्रीक टन कचरा उचलला जातो. यापैकी जवळपास 500 टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. राहिलेला कचरा डंपिंग ग्राऊंडवर फेकला जातो.
त्यामुळे 1700 मधून 500 टन वजा केले तर राहिलेला 1200 टन कचरा गुणिले 18 दिवस केल्यास, 20 हजार टन कचरा पुणे शहरात पडून आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं दोन वर्षापूर्वी आश्वासन
पुणे आणि फुरसुंगी कचऱ्याचा प्रश्न हा आज-कालचा नाही. दोन वर्षापूर्वीही हा प्रश्न पेटला होता. फुरसुंगीकरांनी पुण्याचा कचरा टाकू न देण्याचा पवित्रा घेतला होता.
मात्र त्यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन गावकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी दिलं होतं.
त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील डंपिंगसाठी पर्यायी व्यवस्था शोधण्यासाठी 31 डिसेंबर 2014 पर्यंतची मुदत मुख्यमंत्र्यांनी मागितली होती. त्यामुळे उरळी आणि फुरसुंगी गावांनी त्यावेळी पुकारलेलं आंदोलन तात्पुरतं स्थगित गेलं होतं.
महापौर परदेश दौऱ्यावर
दरम्यान, महापौर मुक्ता टिळक या महिला सक्षमीकरणासाठी आयोजित परिषदेसाठी आठ दिवस मेक्सिको दौऱ्यावर आहेत. तर पालकमंत्री गिरीष बापट हे 2 मे ते 11 मेपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न नेमका कसा निकाली निघणार याकडे पुणेकरांचे डोळे लागून राहिले आहेत.
संबंधित बातम्या
17 दिवसांपासून पुण्यातील कचराकोंडी कायम, नेते परदेश वारीवर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement