एक्स्प्लोर
अक्षय्य तृतीयेनिमित्त विठुरायाला झेंडूंच्या फुलांची आकर्षक सजावट, दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवद्य
डेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयाचा सण आज साजरा केला जात आहे. अक्षय्य तृतीयेचा सण म्हणजे समृद्धी, आनंदाचे प्रतिक मानला जातो. या निमित्ताने राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे.

मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयाचा सण आज साजरा केला जात आहे. अक्षय्य तृतीयेचा सण म्हणजे समृद्धी, आनंदाचे प्रतिक मानला जातो. या निमित्ताने राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे.
अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने विठ्ठल मंदिरात पिवळ्या झेंडूंच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
आजच्या दिवशी देवाचे दर्शन मिळावे म्हणून राज्यभरातून हजारो भाविकांनी पहाटेपासून मंदिरात गर्दी केली आहे. आज विठ्ठल आणि रुक्मिणी गाभाऱ्यात आकर्षक फुलसजावटीमुळे देवाचे रुप जास्तच लोभस दिसत आहे.
आजच्या मुहूर्तावर विठुरायाला या हंगामातील पहिल्या आंब्याचा रस महानैवेद्यात दिला जाणार असून आजपासून रोज श्रीखंडाच्या ऐवजी देवाला आमरसाचं भोजन मिळणार आहे.
दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवद्य
अक्षय्य तृतीयेनिमित्त आज दगडूशेठ गणपतीला 11 हजार आंब्यांचा महानैवद्य दाखवला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवालेचे मंदार देसाई आणि परिवाराच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला आहे.
दादरच्या श्री उद्यान गणेशाला 2100 आंब्यांची आरास
दादरच्या श्री उद्यान गणेशाला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर आज 2100 आंब्यांची आरास करण्यात आली आहे. आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठान-देसाई बंधु यांच्यातर्फे 'श्रीं'च्या चरणी आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हा नैवेद्य बालिकाश्रम, वृद्धाश्रम, अनाथाश्रम येथे वाटण्यात येणार आहे. उद्यान गणेश मंदिरात केलेली ही अनोखी आंब्याची आरास पाहण्यासाठी सकाळपासूनच भक्तांना मंदीरात गर्दी केली आहे.
नाशिकची ग्रामदेवता कालिका मातेच्या मंदिरात आंब्यांची आरास
अक्षय्य तृतीयेनिमित्त नाशिकची ग्रामदेवता आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या कालिका मातेच्या मंदिरात आकर्षक आंब्यांची आरास करण्यात आली आहे. 1008 आंब्यांपासून ही आरास साकारण्यात आली असून यामुळे कालिका देवीचं सुंदर रुप बघायला मिळत आहे. आज साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा मुहुर्त आणि त्यातच मंगळवार असल्याने भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येत असून ही आंब्याची आरास त्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
करमणूक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
