एक्स्प्लोर

Nanded Akshay Bhalerao: नांदेडमधील अक्षय भालेरावच्या कुटुंबीयांना माकपकडून आर्थिक मदतीचा हात; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

Nanded:  जातीय अत्याचाराला बळी पडलेल्या अक्षय भालेरावच्या कुटुंबीयांना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मदतीचा हात दिला आहे

Nanded News:  नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली गावातील अक्षय श्रावण भालेराव याची हत्या ही जातीय श्रेष्ठत्वाच्या अहंकारातून झाली असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. नांदेड शहराजवळील बोंडार हवेली या गावात डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली म्हणून काही सवर्णांनी अक्षय श्रावण भालेराव या तरूणाची निर्घृण हत्या केली होती. 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीच्यावतीने भालेराव कुटुंबियांना एक लाख रुपयांची मदत देण्यात आली. बोंडार हवेली गावातील भूमिहीन श्रावण भालेराव हे स्वतः आणि त्यांची मुले मोलमजुरीवर गुजराण करतात. यावेळी पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी भालेराव कुटुंबियांची भेट घेत सात्वंन केले. दिवंगत अक्षयच्या आई वंदनाबाई यांच्या हाती एक लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. त्यावेळी त्यांच्या सोबत पक्षाचे राज्य सचिवमंडळ सदस्य कॉ. विजय गाभणे, नांदेड शहर सचिव गंगाधर गायकवाड, नांदेड जिल्हा समिती सदस्य कॉ. उज्ज्वला पडलवार, पक्षाचे लातूर जिल्हा सचिव सुधाकर शिंदे, किसान सभेच्या राज्य कौन्सिलचे सदस्य संजय मोरे आदी उपस्थित होते. 

या गावात एका सवर्णांच्या लग्नाच्या वरातीत तरूण हातात नंग्या तलवारी घेऊन नाचत होते.  त्याच वेळी गावातील दुकानात घरगुती सामान  खरेदी करण्यास आलेला अक्षय आणि त्याचा भाऊ आकाश त्या तरूणांच्या नजरेला पडले. त्या तरूणांनी या दोन भावांवर हल्ला केला. त्यात अक्षय ठार झाला आणि आकाशच्या हाताला खोल जखम झाली. अक्षयने गावात डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात पुढाकार घेतला होता. त्या रागातून काही सवर्ण तरूणांनी तलवारी, जंबिये आदी शस्त्रांनी अक्षयची हत्या केली. डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्याच्या बाबतीत तेथील पोलीस खात्याची आणि प्रशासनाची काय भूमिका होती, हेही तपासून पाहिले पाहिजे अशी मागणीदेखील माकपने केली आहे.

या प्रकरणी अक्षयचा भाऊ आकाश याने दाखल केलेल्या तक्रारीवरून या हत्येमागे केवळ वरिष्ठ जातीय अहंकार असल्याचे दिसून येत असल्याचे डॉ. नारकर यांनी म्हटले.  मृत अक्षय आणि त्याचे कुटुंबिय अनुसूचित जातीमधील असून मोलमजुरी करून गुजराण करतात. या वस्तुस्थितीवरून त्यांच्यावर अत्याचार करणे, त्यांचा जीव घेणे हा आपला हक्कच असल्याची अजूनही तथाकथित वरिष्ठ मालमत्ताधार जातीयांमध्ये भावना आहे. भारतीय संविधानाला हे अजिबात मान्य नसल्याचे त्यांनी म्हटले.  या गुन्हेगारी कृत्यामुळे बोंडार हवेली गावातील सामाजिक वातावरण दूषित होऊ शकते. त्यातून आणखी अनर्थ होऊ नये यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला पाहिजे. गावातील सर्व जातींमधील जनतेला सोबत घेत गावात सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, अशी मागणीदेखील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bajrang Sonawane : सरपंच संतोश देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
सरपंच संतोश देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
NCP : राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
Suresh Dhas : कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
Dmart Share Price : डीमार्टचा शेअर बनला रॉकेट, एक बातमी येताच गुंतवणूकदार मालामाल,नेमकं कारण काय?
डीमार्टचा शेअर बनला रॉकेट, एक बातमी येताच गुंतवणूकदार मालामाल,नेमकं कारण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : Saamana तून फडणवीसांचे कौतुक;चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले आभारBharat Gogawale : मंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भरत गोगावलेंची पहिली प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 3 PM 03 January 2025Devendra Fadnavis Speech Satara | शेरो शायरी, छगन भुजबळ यांचं कौतुक;देवेंद्र फडणवीसांचं संपूर्ण भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bajrang Sonawane : सरपंच संतोश देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
सरपंच संतोश देशमुख हत्या प्रकरण दिल्लीत पोहोचलं; खासदार बजरंग सोनवणेंचा मोठा निर्णय, म्हणाले, 'त्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे..'
NCP : राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
राष्ट्रवादीच्या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा; शरद पवारांकडील आमदार, नेते येणार असतील तर आधी 'हे' करा
Suresh Dhas : कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
कारण पर्यावरण खातं सुद्धा आमच्या जिल्ह्यात! सुरेश धस त्या खात्याला उद्देशून नेमकं काय म्हणाले?
Dmart Share Price : डीमार्टचा शेअर बनला रॉकेट, एक बातमी येताच गुंतवणूकदार मालामाल,नेमकं कारण काय?
डीमार्टचा शेअर बनला रॉकेट, एक बातमी येताच गुंतवणूकदार मालामाल,नेमकं कारण काय?
Rajan Salvi : काल म्हणाले मी निष्ठावंत शिवसैनिक, आज राजन साळवींचा सूर बदलला; म्हणाले, 'योग्यवेळी योग्य निर्णय'
काल म्हणाले मी निष्ठावंत शिवसैनिक, आज राजन साळवींचा सूर बदलला; म्हणाले, 'योग्यवेळी योग्य निर्णय'
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी, सोनं  900 रुपयांपर्यंत वाढलं, आजचे दर नेमके किती?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात तेजी, चांदीच्या दरात चमक, आजचे दर जाणून घ्या
Weather Update : दिल्लीत दाट धुक्यांमुळे तब्बल 202 उड्डाणे उशीराने, श्रीनगर आणि अमृतसर विमानतळ बंद; हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमान उणे 14 अंशांवर
दिल्लीत दाट धुक्यांमुळे तब्बल 202 उड्डाणे उशीराने, श्रीनगर आणि अमृतसर विमानतळ बंद; हिमाचलमध्ये बर्फवृष्टीमुळे तापमान उणे 14 अंशांवर
रात्र झाली तरी याला सोडणार नाही; वॉच ठेवणाऱ्या पोलिसाला जितेंद्र आव्हाडांनी धरलं, थेट वरिष्ठांना फोन
रात्र झाली तरी याला सोडणार नाही; वॉच ठेवणाऱ्या पोलिसाला जितेंद्र आव्हाडांनी धरलं, थेट वरिष्ठांना फोन
Embed widget