Akola News : तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्याने सरकारचे आभार मानावेत : बच्चू कडू
Akola News : " दुसऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या राणा दाम्पत्याला लाज वाटायला हवी. जेलमध्ये राणा दाम्पत्याला पोलिसांकडून मारहाण झाली नाही याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानायला हवेत, असं वक्तव्य राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलय.
Akola News Update : शिवसेनेवर (Shive sena) दादागिरीचा आरोप करणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navnit Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी उत्तर दिलय. तुरूंगात मारहाण झाली नाही म्हणून राणा दाम्पत्याने सरकारचे आभार मानावेत असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. "शिवसेनेची दादागिरी ही प्रामाणिकपणाची आहे. मातोश्री हे शिवसेनेचं श्रद्धास्थान आहे. त्याला ललकारण्याचा प्रयत्न शिवसैनिक कसे सहन करणार?, असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे.
"दुसऱ्यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या राणा दाम्पत्याला लाज वाटायला हवी. जेलमध्ये राणा दाम्पत्याला पोलिसांकडून मारहाण झाली नाही याबद्दल त्यांनी सरकारचे आभार मानायला हवेत. आता राणा दाम्पत्याला तक्रार करण्यासाठी दिल्ली हेच एकमेव ठिकाण उरलं आहे. त्यांनी सरकारी कार्यालयात तक्रार केली तरी त्याची दखल भाजपच्या कार्यालयातून घेतली जाते, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे.
दरम्यान, ओबीसी आरक्षणावरून बच्चू कडू यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मुख्यमंत्री असताना का सोडला नाही? असा सवाल उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर आता राज्य सरकारला मदत करायला पाहिजे असं आवाहनही बच्चू कडूंनी फडणवीस यांना केलं आहे. याबरोबरच ओबीसींचा राजकीय हक्क हिरावण्याचा केंद्राचा डाव असल्याचा आरोप मंत्री कडू यांनी केला आहे.
हनुमान चालिसेपेक्षा देशासमोरचे इतर प्रश्न महत्वाचे
"देशासमोर हनुमान चालिसेच्या मुद्द्यापेक्षा महत्वाचे प्रश्न आहेत. माध्यमांनी देखील अशा मुद्द्यांपेक्षा लोकांच्या प्रश्नाला महत्व द्यावं. विरोधकांनी वारंवार हा प्रश्न तापत ठेवण्यापेक्षा हनुमान चालिसा सप्ताह ठेवावा, आपण त्यांना यासाठी वर्गणी देऊ, असा टोलाही यावेळी बच्चू कडूंनी लगावला.
महत्वाच्या बातम्या